भिवंडीत  सिलेंडरचा स्फोट झाल्याने भिषण आग, नागरिकांना ची धावपळ उडाली

भिवंडी



भिवंडी – भिवंडी शहरातील आदर्श पार्क येथील मातीची मडकी विकणाऱ्याच्या दुकान असणाऱ्या मोकळ्या जागेत मंगळवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.या आगीत त्यालगत असलेल्या झोपडीत असलेला  सिलेंडर गँसचा भिषण स्फोट झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.आगीच्या ज्वाळा इतरत्र पसरल्याने एक मोटरसायकल आगीच्या भक्क्षस्थानी पडली तर एक इसम जखमी झाला आहे.या आगीची माहिती स्थानिक नागरिक व पोलिसांनी भिवंडी पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना कळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सुमारे दोन तास पाण्याचा मारा करीत ही आग आटोक्यात आणून विजवली आहे. भिषणमुळे सुरक्षिता च्या दृष्टिकोनातून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे गणेश दर्शनासाठी उभारलेल्या नागरिकांची सुद्धा धावपळ उडाली होती त्यामुळे पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला होता
     मंगळवारी गणेश जयंती असल्यामुळे शहरातील विविध भागात गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे आदर्श पार्क येथे अनेक गणेश भक्त हे गणेशाच्या दर्शनासाठी जात असताना अचानक पणे मातीची मडकी विकण्याचे ठिकाणी आग लागली तेथे छप्पर ताडपत्री चे असल्याने आग भडकत गेल्याने तेथील झोपडीत असलेला सिलेंडरचा भिषण स्फोट झाला कानठळ्या बसविणारा आवाज झाल्याने रस्त्यावरून जाणारे नागरिक व महिला वर्ग घाबरून सैरावैरा पळत होते. आगीने भिषण रौद्र रूप धारण केल्याने नागरिकांना मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान त्यावेळी या परिसरात निजामपूर पोलिसांची गस्त सुरू असल्याने त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती भिवंडी अग्निशामक दलाला दिली.त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर दोन तासात नियंत्रण मिळवत आग विझवली आहे. ही आग कशामुळे लागली याचे मात्र कारण अद्याप समजले नसून पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे अशी माहिती स्थानिक निजामपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *