गणेश जन्मोत्सव भिवंडीतील गणपती मंदिरात उत्साहात संपन्न.ठिकठिकाणी विद्युत रोषणाईने केली सजावट

भिवंडी




भिवंडी ( भानुदास भसाळे  ) भिवंडी शहर परिसरात असलेल्या गणपती  मंदिरात आज दुपारी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात संपन्न झाला. यावेळी महिलांनी पाळण्यात बाल गणेश मुर्ती ठेऊन गायण करीत गजाननाचा जयघोष केला यावेळी उपस्थित महिलांसह नागरीकांनी गणपती मूर्ती वर पुष्पवुष्टी केली.यावेळी उत्साही भक्तांनी मंदिरा समोर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली.
     गणेश जयंती निमित्त आज भिवंडी टाँकीज येथील गणपती मंदिरात विविध प्रकारचे फुलांची व विद्युत रोषणाईने करून आकर्षक सजावट केली होती त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती तसेच ब्राम्हण आळी गणपती मंदिर,कामतघर गणेश  मंदिर,
प्रभुआळी गणपती मंदिर अशा विविध ठिकाणी असलेल्या मंदिरास आकर्षक विदयुत रोषणाई व फुलांची आरास करून सजविण्यात आले होते. पहाटे पासुन अभिषेक, काकडा आरती,प्रवचन भजन,किर्तन व महाप्रसादाचे आयोजन मंदिर व्यवस्थापका कडुन करण्यात आले होते. त्यामुळे भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
भिवंडी तालुक्यातील अंजूर या गावामध्ये पेशवेकालीन इतिहास लाभलेला श्री.सिद्धिविनायक 
मदिर आहे.पेशव्यांचे इनामदार असलेल्या गंगाजी नाईक यांच्या नाईकवाड्यातील पुरातन सिद्धिविनायक मंदिरात गणपती
दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली.
तसेच तालुक्यातील
कारीवली,कोनगांव, राहनाळ,काल्हेर, कशेळी, खारबाव, अंजूर,शेलार अशा विविध गावात राहणाऱ्या गणेश मंदिरात भाविकांची मोठी गर्दी केली होती. तसेच जयंती निमित्त  घरामध्ये गणपती मूर्तीची स्थापणा करून उत्सव आयोजित करून पालखी व प्रसाद सोहळ्याचे आयोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *