एकाच रात्री दोन मंदीरामध्ये चोरी करणा-या चोरट्यांस भिवंडी पोलिसांनी केले गजाआड

भिवंडी



भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या दोन मंदिरात एकाच रात्रीत मंदिरातील घंटा,दानपेटी चोरीचा खळबळजनक घटना घडल्या नंतर
पोलिसांनी सखोल तपास करीत अवघ्या तीन तासात आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळाले आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली आहे.
          पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शांतीनगर परिसरातील सुभाषनगर भागातील हनुमान मंदीर तसेच अग्नीमाता मंदीर या दोन्ही मंदीरात सोमवारी रात्री हनुमान मंदीराचे भिंती वरून मंदीरात तसेच लगतच्या अग्नीमाता मंदीरात प्रवेश करून दोन्ही मंदीरामधील पितळी धातुच्या घंटा,पितळी नाग प्रतीकृती तसेच दानपेटी व इतर वस्तु असा एकुण एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता.हनुमान मंदीराचे पुजारी आनंद रमेशचंद्र शुक्ला यांनी या बाबत शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त एस. गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर, पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे
पोलिस हवालदार संतोष पवार,पोलिस नाईक श्रीकांत पाटील,किरण जाधव,रविंद्र पाटील, नरसिंह क्षीरसागर, रोशन जाधव या पोलीस पथकाने
मिळालेल्या माहितीवरून सापळा लावुन जब्बार कंपाऊंड या परिसरातून मोहमद साकीब उर्फ सलमान अख्तर अंसारी (वय 22 वर्षे) यास ताब्यात घेऊन त्याकडे कडून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली देत मंदिरातून चोरी केलेले सर्व एक लाख 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.गुन्हा दाखल झाल्या नंतर अवघ्या तीन तासात आरोपीस शिताफीने अटक करून मुद्देमाल  हस्तगत केलाआहे. पुढील तपास वपोनि शंकर इंदलकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *