भिवंडीत महापालिका सीटी सेवा प्रवासी बस सुरू करणार.. महापौरा – नारायण चौधरी

भिवंडी

भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी शहर परिसरात महापालिका प्रशासनाची सीटी बस सेवा नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते गेल्या अनेक वर्षापासून महापालिका प्रशासन अर्थसंकल्पामध्ये ई बस सेवा सुरू करणार असे आश्वासन देत होती मात्र त्याची पूर्तता होत नव्हते मात्र आता राज्य शासन व केंद्र सरकारच्या सहकार्याने महापालिके मार्फत भिवंडी शहरात सिटी बस (प्रवासी बस) चालवण्याचे नागरिकांचे स्वप्न आणि प्रतीक्षा लवकरच पूर्ण होणार आहे.असल्याची माहिती महापालिकेचे महापौर नारायण चौधरी यांनी दिली. बस सेवा सुरू करणें संदर्भात त्यांनी भिवंडी मनपा व कल्याण डोंबिवली मनपा अधिकारी वर्गाची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला आहे. यावेळी आमदार महेश चौघुले व पालिकेचे उपायुक्त व अधिकारी वर्ग उपस्थित होते.


भिवंडी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन 25 वर्षे झाली,
आजपर्यंत एक हजार कोटी रुपयांचे बजेट असलेल्या महापालिका प्रशासनाला भिवंडीवासीयांच्या सोयीसाठी प्रवासी
सीटीसेवा बस योजना सुरू करता आलेली नाही.मात्र आता लवकरच महापालिकेच्या एकूण १०० इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. केंद्र सरकारकडून बसेस महापालिकेला मिळणार आहेत.त्यासाठी पालिका प्रशासनाला शहरातील विविध भागात चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू झाल्याची माहिती महापौर चौधरी यांनी दिली. या संदर्भात महापालिका प्रशासन तीन शहरांना जोडणारी ई बससेवा कार्यान्वित करण्याच्या योजनेवर काम सुरू केले असल्याची माहिती देण्यात आली, ही बस सेवा सुरू केल्याने महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत तर वाढणारच शिवाय शहरवासीयांना स्वस्त प्रवासाचा लाभ मिळण्याबरोबरच वाहतुकीची सोयही वाढणार आहे.या योजनेच्या संदर्भात माहिती देताना भिवंडी महानगर पालिकेचे महापौर नारायण चौधरी यांनी सांगितले की, महापालिका प्रशासन स्वत:च्या १०० इलेक्ट्रिक बसेस चालवणार आहे. केंद्र सरकारच्या परिवहन विभाग व कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त प्रशासन यांच्या सोबत समन्वय साधून त्याची मंजुरी घेतलीआहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत आहे,महापालिकेने कोंबडपाडा,टेमघर, शांतीनगर,कल्याण रोड अशा विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन बनवण्यासाठी जागा निश्चित करून तेथे चार्जिंग स्टेशन तयार करण्याचा उपक्रम सुरू आहे.पालिकेने स्वत:च्या बसेस सुरू केल्यास पालिकेची आर्थिक स्थिती सुधारेल असे नाही, तर भिवंडीचा नजीकच्या सर्व शहरांशी संपर्कही वाढेल अशी माहिती महापौर चौधरी यांनी दिली,ई बस सेवा सुरू करणे संदर्भात शासनाकडून योग्य ती मदत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार महेश चौघुले यांनी दिली.सध्या शहरात येणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिकेच्या बसेसमुळे शहरातील आणि शहराबाहेरील नागरिक, विद्यार्थी व इतर लोक ये-जा करतात. व्यावसायिकांना प्रवासाची सोय होऊ लागली. वेळेची बचत झाली आणि त्या महापालिकेला आर्थिक लाभही मिळाला. परिवहन महामंडळाच्या बसेस देखील शहरातील विविध ठिकाणापासून सुरु आहेत. तरी देखील ठराविक वेळेत मोठ्या संख्येने शहरातील नागरिक खाजगी वाहनातून प्रवास करीत आहेत. या नवीन बसेसमुळे अशा सर्व नागरिकांची सोय होईल त्याच बरोबर शहरातील दुचाकीचे प्रमाण देखील कमी होण्याचे संकेत महापौर नारायण चौधरी यांनी दिले. तसेच या नवीन बसेसमुळे शहर परिसरात प्रदूषणही होणार नाही व पर्यावरण पुरक प्रवास असेल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. परिवहन सेवा उल्हासनगर, भिवंडी, कल्याणमध्ये समिती स्थापन करण्यात आली असुन बस सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे,