भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील गटार व नाले सफाई चे काम महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिलेल्या आदेश निर्देशानुसार योग्य चांगल्या पद्धतीने
होणे आवश्यक आहे.100 % टक्के नाले सफाई व मुख्य गटार सफाई काम करून घेण्या मध्ये कोठेही हयगय, कसूर अथवा हलगर्जी पणा होता कामा नये जर आपणाकडून 100 % टक्के उत्तम प्रकारे नाले सफाई व मुख्य रस्त्याचे मुख्य गटार सफाई करून घेण्यास कसूर होवून भिवंडी कार्यक्षेत्रात कोठेही पावसाचे पाणी भरून पूर परिस्थिती निर्माण होवून कोणत्याही प्रकारची जीवित हानी,वित्तहानी झाल्यास तसेच कोणत्याही प्रकारची असंवेदनशील परिस्थिती निर्माण होवून कोणत्याही प्रकारची अघटीत घटना किंवा अपघात झाल्यास त्यासाठी आपणास व्यक्तिशः जबाबदार पकडून आपणावर पुढील कारवाईसाठी जबाबदारी निश्चित करण्यात येईल आणि त्या कारवाईला आपण स्वतः जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी असा परखड इशारा पत्र महापालिकेचे आरोग्य अधिकारी एच.डी.
गुळबी यांनी पालिकेचे आयुक्तांचे आदेशा
नुसार कनिष्ठ अभियंता व प्रभाग आरोग्य निरीक्षक व ठेकेदार यांना दिले आहे. त्यामुळे पालिका कर्मचारी व ठेकेदारी वर्गात खळबळ मानली आहे.

भिवंडी शहर परिसरात पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून महापालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशानुसार ठेकेदारामार्फत गटार व नाले सफाई चे काम हाती घेण्यात आले आहे मात्र काही ठिकाणी ठेकेदार कामचुकारपणा करीत आहेत याबाबत काही नागरिकांनी आयुक्तांकडे तक्रार करताच महापालिका आयुक्त वैद्य यांनी विशेष दखल घेऊन नाले व गटार सफाई ची कामे योग्य पद्धतीने करा अन्यथा कारवाई केली जाईल असा आदेश आरोग्य व स्वच्छता विभाग संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आणि ठेकेदार दिला आहे.
त्यामुळे नालेसफाई आरोग्य विभाग प्रमुख हेमंत गुळवी यांनी आयुक्तांचे आदेशानुसार दखल घेऊन भिवंडी शहरातील विविध नाल्यांना भेटी घेऊन पाहणी करीत नालेसफाई योग्य पद्धतीने करण्याचे सुचना पालिकेचे कनिष्ठ अभियंता, प्रभाग आरोग्य निरीक्षक,
आरोग्य निरीक्षक, नाले सफाई व मुख्य रस्त्याचे मुख्य गटार ठेकेदार,प्रभाग समिती क्रमांक 1 ते 5 अधिकारी यांना दिले आहेत.आयुक्तांनी दिलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे की प्रभाग समिती क्रमांक 1 ते 5 कार्यक्षेत्रात नाले सफाई व मुख्य रस्त्याच्या मुख्य गटारची सफाई करण्याचे काम चालू आहे त्या ठिकाणी सर्वांनी दैनंदिन प्रत्येक दिवशी प्रत्यक्ष 100% टक्के नाले सफाई व मुख्य रस्त्याचे मुख्य गटार सफाई उत्तर पद्धतीने करावी व दैनंदिन केलेल्या कामाची नोंद आपल्या नोंद वही मध्ये व दिलेल्या फॉरमॅट मध्ये नोंद करून घेऊन आयुक्तांना अहवाल सादर करावा नाले सफाई व मुख्य गटार सफाई करून घेण्या मध्ये कोठेही हयगय, कसूर अथवा हलगर्जी पणा होता कामा नये जर आपणाकडून
नाले सफाई व मुख्य रस्त्याचे मुख्य गटार सफाई करून घेण्यास कसूर होवून भिवंडी कार्यक्षेत्रात कोठेही पावसाचे पाणी भरून पूर परिस्थिती निर्माण होवून कोणत्याही प्रकारची जीवित हानी,वित्तहानी झाल्यास तसेच कोणत्याही प्रकारची असंवेदनशील परिस्थिती निर्माण होवून कोणत्याही प्रकारची अघटीत घटना किंवा अपघात झाल्यास त्यासाठी आपणास व्यक्तिशः जबाबदार पकडून आपणावर पुढील कारवाईसाठी जबाबदारी निश्चित करण्यात येईल कारवाईला केली जाईल असा इशारा आयुक्त वैद्य आरोग्य व स्वच्छता विभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे.त्यामुळे ठेकेदार व अधिकारी व कर्मचारी वर्गात खळबळ माजली आहे.
चौकट
भिवंडी शहरातील नाले सफाई व गटार सफाईच्या कामाच्या ठिकाणी भेटी देत असून आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कामाची पाहणी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे.
हेमंत गुळवी आरोग्य अधिकारी
भिवंडी मनपा.