निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली माहिती.
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये अटीतटीची निवडणूक मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साहामध्ये व सौदाह्य वातावरणात संपन्न झाली आहे.त्यामुळे आता मंगळवार 4 जून 2024 रोजी निवडणूक मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार असल्याची चर्चा रंगत असतानाच भिवंडी लोकसभा मतदार संघातील शासकीय निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज असल्याची माहिती 23, भिवंडी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.
भिवंडी लोकसभा मतदार संघात दि.20 मे 2024 रोजी मतदान निवडणूक प्रक्रिया संपन्न झाले होती अटीतटीच्या मतदान निवडणुकीत एकूण 12 लाख 50 हजार 76 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क नोंदवला होता.त्यामुळे मतदारसंघात वाढलेल्या मतदाना संदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. झालेल्या निवडणूकीची मतमोजणी
भिवंडी तालुक्यातील कल्याण सापे पडघा रोड, सावद गाव, पो.आमणे, येथे मंगळवार दि.4 जून 2024 रोजी सकाळी 8 पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.

मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पहिले प्रशिक्षण शिबीर शहरातील ओसवाल समाज हॉल अंजुर फाटा येथे संपन्न झाले.आता मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण शिबीर (रंगीत तालीम) दि. 03 जून 2024 रोजी दुपारी 11.00 मतमोजणीच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात सहाही विधानसभा मतदार पैकी पाच पाच विधानसभा मतदारसंघात एकूण 14 याप्रमाणे टेबल लावण्यात आले आहेत, तर मुरबाड विधानसभा मतदारसंघ अंतर्गत 21 टेबल,तर टपाली मतदान मतपत्रिका मोजणी करता एकूण 14 टेबल,
अत्यावशक सेवेतील कर्मचारी व गृह मतदान यांचे मतमोजणी एक टेबल, असे एकूण 106 मतमोजणी टेबलवर मतमोजणी होणार आहे. टपाली मतपत्रिकेची मतमोजणी ही सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार कोष्टी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या अधिपत्याखाली टपाली मतपत्रिकेचे मोजणी होणार आहे.यामध्ये गृह मतदान, दिव्यांग मतदान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचे एकूण 4 हजार 263, मतदान आहे, तर सर्विस वोटर ची संख्या आजपर्यंत 116 आहे. असे एकूण 4 हजार 389 टपाली मतपत्रिका मतमोजणी करण्यात येणार आहे. सहा विधानसभा संघात मतमोजणी होणार आहे. सदरची मतमोजणी ही संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली होणार आहे. एकूण 106 टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार असून, 134 भिवंडी ग्रामीण 25 फेऱ्या, 135 शहापूर करता 24 फेऱ्या, 136 भिवंडी पश्चिम करता 22 फेऱ्या, 137 भिवंडी पूर्व करता 23, 138 कल्याण पश्चिम करता 29, आणि 139 मुरबाड याकरता 25 फेऱ्या होणार आहेत. जास्तीत जास्त मतदानाच्या एकूण 29 फे-या होणार आहेत. किमान चार वाजेपर्यंत मतमोजणी चालेल व निकाल जाहीर होतील. प्रत्येक मतमोजणी टेबलवर
मतमोजणी करता एक निरीक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई, केंद्रीय सूक्ष्म निरीक्षक यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत,केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे दोन निरीक्षकांची नियुक्ती या मतमोजणी करता करण्यात आलेली आहे.भिवंडी (प)सह निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे,भिवंडी (पू)अमित सानप,भिवंडी (ग्रा) विकास गजरे यांच्या सह
केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांच्यामार्फत सकाळी सहा वाजता मतमोजणी कर्मचारी वर्गाचे रंडेमायझेशन होणार आहे.सहाही विधानसभा मतदारसंघातील एकूण 12 लाख,50 हजार 76 मतदान झाले होते. मतमोजणीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच सर्व सहाही निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या हाताखालील सर्व कर्मचारी व यांच्या सर्व एकूण याप्रमाणे अंदाजे मतमोजणी कामी एकूण 550 अधिकारी व कर्मचारी (पोलीस स्टाफ वगळून) वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. अंदाजे साडेपाचशे आसपास
मतमोजणी ठिकाणी व केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी कोणालाही मोबाईल घेऊन जाता येणार नाही, प्रसार माध्यम कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत जे पत्रकार, माध्यम प्रतिनिधी, फोटोग्राफर यांना पास उपलब्ध करून दिलेले आहेत सदरचे ज्यांच्याकडे पास आहेत त्यांनाच आत मध्ये सोडण्यात येईल त्यांना माध्यम कक्षात सोडण्यात येईल, पण प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाता येणार नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.