भिवंडीत पोलीस, निवडणूक भरारी पथकाची धडक कारवाई तीन लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

भिवंडी


भिवंडी (प्रतिनिधी ) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोमात वाजत असुन पोलीस व निवडणूक यंत्रणा सतर्कपणे काम करीत आहे. निवडणूक पार्श्वभूमीवर
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे व ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शना खाली ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची पोलीस व निवडणूक भरारी पथकाकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. 136 भिवंडी पश्चिम विधानसभा निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे या मार्गदर्शनाखाली निवडणूक भरारी पथक व नारपोली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत संशयित वाहनांमध्ये तीन लाख 31 हजार 609 रूपयांचा मुद्देमाल पकडला आहे.चौकशीत हा माल विनातपशील आढळला असून  चांदी व चांदीचे सामान आढळून आले आहे. सदर वस्तूंची बिले तपासणी दरम्यान सादर न केल्याने भरारी पथकामार्फ़त धड़क कारवाई करीत हा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांनी दिली. याबाबत पोलीसांनी नोंद घेत तपास सुरू केला आहे.


      भिवंडी पश्चिमचे विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी उदय किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली
भरारी पथक क्र.7 व नारपोली पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत रविवार (दि.27) पहाटे ३ वाजता एक संशयित वाहन नारपोली पोलीस ठाण्याचे हद्दीतून जात असताना पोलीस व भरती पथकाने  गाडी अडवून वाहनामधील सामानाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता वाहनचालक व गाडीतील इतर कर्मचाऱ्याना सामानाबाबत कोणतीही माहिती देता न आल्याने पोलिसांनी सदर गाडी नारपोली पोलीस ठाण्यात आणली. पोलीस व भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी गाडीतील साहित्य गाड़ीतुन खाली उतरवून संशयित वाहनातील सामानाची तपासणी केली
73 छोटे मोठे बॉक्स मधील साहित्य व त्या साहित्याच्या बिलाची तपासणी केली. या वाहनामध्ये असलेल्या 72 बॉक्स मधे सोने, चांदी व गिफ्ट आर्टिकल असलेले 
दोन कोटी 8 लाख 17 हज़ार 820 रुपयेचा मुद्देमाल सापडला.दरम्यान संबंधित कुरिअर चालकाने बॉक्सनिहाय त्यात समाविष्ट असणाऱ्या साहित्य व तपशील असणारे पक्के बिल यावेळी सादर केले त्यामुळे त्याचे व सामान वस्तू व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यानुसार एकूण ६० बॉक्स मध्ये असलेल्या सोने व चांदी चे गिफ्ट आर्टिकलचे 2 कोटी 4 लक्ष 86 हजार 211 चे बिल सादर केले.उर्वरित असलेल्या बॉक्समध्ये असलेल्या तीन लाख 31 हजार 609 रूपयांचा मुद्देमाल त्यात चांदी व चांदी चे काम असलेले गिफ्ट आर्टिकल असून त्याचे बिल संबंधितास सादर करता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेऊन चौकशी सुरू केली आहे.

चौकट
वाहनातून सामानांची ने-आण करताना त्याची अधिकृत बिले सोबत ठेवावी. तपासणी दरम्यान अनधिकृत ऐवज व रक्कम सापडल्यास कारवाई केली जाणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *