17 उमेदवारांचे अर्ज उमेदवार वैध..
तर भिवंडी पश्चिम मतदारसंघात 26 अर्ज वैध..
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे पडघम जोमामध्ये वाजू लागले असून भाजप, शिवसेना,काँग्रेस, समाजवादी सह अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरून प्रचाराची रणनीती सुरू केली आहे 137 – भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज बुधवार (दि.30) काटेकोरपणे निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप यांच्या उपस्थितीत करण्यात आली.या छाननी प्रक्रियेत 137 – भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघात छाननी अंती नामनिर्देशन पत्र दाखल केलेले सर्व (17 ) उमेदवार वैध ठरले आहेत, अशी माहिती भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप यांनी दिली.यावेळी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक सर्व
साधारण निरीक्षक श्रीम. अमना तस्नीम उपस्थित होत्या.तर
भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघात आमदार महेश चौगुले,शेख खालिद गुड्डू, दयानंद चौरघे, विलास आर.पाटील यांच्या सह 26 अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांनी दिली.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवार दि.29 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 03.00.०० वाजता संपली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदती अखेर भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघात एकूण 23 उमेदवारांनी 30 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. या सर्व नामनिर्देशन अर्जाची छाननी
निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप यांनी आज सकाळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीं समोर केली.
चौकट
भिवंडी पुर्व विधानसभा मतदारसंघात
१) रूपेश लक्ष्मण म्हात्रे – अपक्ष
२) संतोष मंजय्या शेट्टी – शिवसेना (शिंदे गट)
३) भुमेश राजय्या कल्याडपू – अपक्ष
4) शंकर नागेश मुटकिरी – अपक्ष
५) मनोज वामन गुळवी – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
६) तेजस रामदास पाटील – अपक्ष
७) विशाल विजय मोरे – अपक्ष
८) इमरान उस्मान शेख – अपक्ष
९) रईस कासम शेख – समाजवादी पक्ष 3 अर्ज आहेत.
१०) विठ्ठल नामदेव जाधव – अपक्ष
११) तेजस साहेबराव आढाव – अपक्ष
१२) नारायण प्रताप वंगा – राईट टू रिकॉल
१३) रफीक इस्माईल मुल्ला – अपक्ष
१४) परशुराम रामपहाट पाल – बहुजन समाज पक्ष
१५) वसीम साबीर अन्सारी – अपक्ष
१६) प्रकाश अरूणोदय वड्डेपेल्ली – अपक्ष
१७) इस्माईल मो. युसुफ रंगरेज – अपक्ष यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांना दि. 04 नोव्हेंबर 2024 रोजी दु.3. वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सानप यांनी दिली.
