सर्वोच्च न्यायालयातील ठाकरे गटाच्या याचिकेवर आता थेट मार्चमध्ये सुनावणी

देश

MLA disqualification case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात  (MLA disqualification case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या निकालाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालायात (Supreme Court) आव्हान दिले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता थेट राज्यसभा निवडणुकीनंतर म्हणजेच 1 मार्च 2024 रोजी होणार आहे. सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असे या खटल्याचे स्वरुप आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल (Kapil Sibal) हे न्यायालयात युक्तीवाद करत आहेत. तर शिंदे गटाचे वतीने हरिश साळवे आणि महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केलाय. या प्रकरणी न्यायालय कोणता ऐतिहासिक निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देणार

राष्ट्रवादी (NCP) आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या दोन्ही गटांकडून आपआपली मते मांडण्यात येत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकांनी म्हटले की, 15 फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेबाबत दिलेला निकालाप्रमाणेच राष्ट्रवादीबाबतचाही निर्णय येतो का? याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे.

राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देण्यास 15 दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला होता. त्यामुळे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणानंतर लवकरच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर देखील येत्या काही दिवसांत निकाल लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर निवडणुक आयोगाने अजित पवारांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह दिले आहे. तसेच या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात देखील सुनावणी सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *