राष्ट्रवादी उमेदवाराच्या अडचणी वाढल्या..भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रचारापासुन दुर..

भिवंडी

 

भिवंडी (प्रतिनिधी)  भिवंडी लोकसभेची पारंपारिक जागा काँग्रेस पक्षाच्या हातून हिसकावून घेतल्याच्या धक्क्यातून काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते अजूनही सावरलेले नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे घोषित उमेदवार सुरेश (बाल्यामामा) म्हात्रे यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहेत.काँग्रेसचे उमेदवार सुरेश  म्हात्रे यांचे अनेक प्रयत्न आणि मन वळवूनही काँग्रेस नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या बाजूने निवडणूक प्रचाराचे काम करण्यास तयार नाहीत.दिल्लीत बसलेल्या त्यांच्या हायकमांड नेत्यांशी अजूनही चर्चा सुरू असून भिवंडी लोकसभेची जागा अखेर काँग्रेसच्याच बाजूने येऊ शकते, असा आशावाद काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.            विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेस पक्षाचा पारंपरिक 
भिवंडी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याकडे गेला आहे.त्यामुळे
घाईघाईने राष्ट्रवादी आघाडी गटाने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देत निवडणूक प्रचार सुरू केला आहे.तर भिवंडीची जागा बळजबरीने आपल्या हातातून हिसकावून घेण्याची क्लुप्ती काँग्रेसजन अजूनही विसरलेले नाहीत.
राष्ट्रवादीचे उमेदवार म्हात्रे यांनी सर्व प्रयत्न करूनही काँग्रेसवाले अजूनही प्रचारात सहभागी होत नसल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार म्हात्रे यांची निवडणूकी आधीच परिस्थिती कमकुवत दिसत आहे.मात्र अद्याप उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत त्यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलतील हे नाकारता येणार नाही.  दरम्यान काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी अपक्ष  निवडणूक लढविण्याची घोषणा करीत प्रचार सुरू केल्याने राष्ट्रवादी गटात खळबळ माजली आहे.भिवंडीत राष्ट्रवादीचे बडे नेते तिकीट वाटपाच्या लढतीत काँग्रेसचा पराभव झाल्याचा आनंद व्यक्त करीत आहेत.त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते तीव्र नाराज झाले असून ते इतर पक्षाची कास धरत आहेत. भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा जोरदार प्रचार करीत मतदारांशी संवाद सुरू केला आहे.सलग दोनवेळा खासदार राहिलेले भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडी कोणती रणनीती आखते हे पाहणे यावेळी उत्सुकतेचे ठरणार आहे.भिवंडी लोकसभा मतदारसंघ ही काँग्रेसची अनेक वर्षांपासूनची परंपरागत जागा आहे.
असे असताना या मतदारसंघात सलग दोनदा पराभव झाल्यानंतर शरद पवार यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला कमकुवत ठरवत ही जागा आपल्या बाजूने वळवून घेतली आहे.त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी चा उमेदवार
कपिल पाटील यांना टक्कर देऊ शकतील का.? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *