कामकाजावर करडी नजर.
भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू झाली असून उमेदवारी आपले नामनिर्देशन अर्ज भरले आहेत. त्यामुळे आता चुरस निर्माण झाले आहे.ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सुध्दा सतर्कपणे राहुन अधिकाऱ्याच्या विशेष बैठका
घेऊन
शांतता व सुव्यवस्थेवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.असे असतानाच भारत निवडणूक आयोगाने 23 भिवंडी लोकसभा मतदार
संघासाठी सर्वसाधारण निरीक्षक,खर्च निरीक्षक व पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून हे तीनही निरीक्षक मतदार
संघात दाखल झाले असून त्यांनी कामकाजाला सुरूवात केली आहे अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
23 भिवंडी लोकसभा मतदार
संघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून राजनवीर सिंग कपूर (आयएएस), खर्च निरीक्षक म्हणून श्री.चित्तरंजन धंगडा माझी (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक म्हणून के. जयरामन (आयपीएस) यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली असून हे तीनही निरीक्षक भिवंडी लोकसभा मतदार
संघात दाखल झाले आहेत.23-भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निरीक्षक श्री.कपूर (आयएएस) यांचा संपर्क क्रमांक 8356074530 व 02522-230200 आणि फॅक्स क्र. 02522-220108 असा असून genobserverbhiwandi@gmail.com हा त्यांचा ईमेल आहे. श्री.कपूर यांना उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय, ठाणे रोड, गुलजार नगर, भिवंडी, ता.भिवंडी येथे दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत भेटता येईल. पोलीस निरीक्षक श्री. जयरामन (आयपीएस)
यांचा संपर्क क्रमांक 8788484783 असा असून ईमेल पत्ता 23.bhiwandi.plcobs@gmail. com असा आहे. श्री.जयरामन यांना ठिकाण एम.एस.
टी.सी.एल.
रेस्ट हाऊस, पहिला मजला, पडघा, ता.भिवंडी येथे दुपारी 4.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत भेटता येईल. निवडणूक खर्च निरीक्षक श्री.माझी (आयआरएस) यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, उपविभागीय कार्यालय, भिवंडी येथे भेटण्याची वेळ दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. क्रमांक केंद्रीय खर्च निरीक्षक श्री. माझी (आयआरएस) यांचा मतदारसंघातील संपर्क क्रमांक ८३६९७३६०८२ असा असून bhiwandiexpobs@gmail.com हा त्यांचा ई-मेल आहे.
