राष्ट्रपती पदक विजेते डीसीपी सुधीर दाभाडे यांनी आपला कार्यभार नवी मुंबईत स्विकारला…

भिवंडी

भिवंडी (प्रतिनिधी) ठाणे व भिवंडी पोलीस उपाआयुक्त परिमंडळ 2 मध्ये यशस्वी कामगिरी करून राष्ट्रपती पदक प्राप्त करणारे पोलीस उपाआयुक्त सुधीर गणपतराव दाभाडे यांची महाराष्ट्र शासनाने पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण मुंबई आणि कोकण विभागाच्या सदस्यपदी (Sp.Dcp) नियुक्ती झाली आहे.त्यामुळे त्यांनी आज सकाळी नवीमुंबई खारघर येथील कार्यालयात आपल्या कामाचा पदभार स्विकारला आहे. त्यामुळे मान्यवर पोलिस अधिकारी व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


     पोलीस उपाआयुक्त म्हणून यशस्वीपणे काम करणारे
सुधिर दाभाडे यांनी आजपर्यंत केलेल्या भरीव कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पुढील तीन वर्षांकरीता ही पुनर्नियुक्ती केली आहे. पोलीस खात्यात सेवा देत असतांना सुधीर दाभाडे यांनीअतिसंवेदनशील असलेल्या भिवंडी, परभणी, वाशिम,हिंगोली,ठाणे अशा विविध शहरात अतिशय मेहनत प्रामाणिकपणे निष्ठा ठेवून सेवा बजावल्यामुळे त्यांना दोनवेळा राष्ट्रपती पुरस्काराने सुद्धा गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने केंद्र सरकार तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये विभागवार पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण निर्माण केले आहेत. सदर प्राधिकरणाचे अध्यक्ष हे जिल्हा न्यायाधिश किंवा उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती असतात.तसेच या प्राधिकरणावर त्या त्या विभागातील कार्यरत उपायुक्त हे पदसिद्ध सदस्य, एक अशासकीय सदस्य आणि एक सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त सदस्य म्हणून नेमल्या जातात. सदर प्राधिकरण हे जनतेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारी चौकशी करून त्याचे निवारण करणे तसेच कसुरवार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कार्यवाही करण्या संदर्भात शासनाकडे (गृह विभाग) प्रस्ताव पाठविणे यासाठी स्थापन करण्यात आले आहे. पोलीस तक्रार निवारण  प्राधिकरणावर सुधिर दाभाडे यांची नियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने राज्य शासनाच्या गृह विभागाने केली आहे. दाभाडे यांची नियुक्ती भिवंडीकरांसाठी भुषणावह बाब असुन या नियुक्तीबद्दल सुधिर दाभाडे यांचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या सह मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *