निवडणूक विभागव सहाय्यक पोलीस आयुक्तांची धडक कारवाई.
भिवंडी ( प्रतिनिधी ) ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम जमामध्ये वाजू लागले असून निवडणूक यंत्रणा व पोलीस अथक सतर्क होऊन काम करू लागले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे. होणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे व ठाणे जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी अशोक शिंनगारे हे दररोज कामाचा आढावा घेत आहेत.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहणांची कसून तपासणी होत आहे असे असताना शहरातील धामणकर नाका या परिसरातून जाणाऱ्या एका वाहनास सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बापू सांगळे यांच्या विशेष पथकाने अडवून तपासणी केली असता सदर वाहनात सुमारे दोन कोटी 30 लाख 17 हजार 600 रुपयांची रोकड आढळून आली या रोख रक्कमे संदर्भात चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही त्यामुळे पोलिसांनी निवडणूक विभाग अधिकाऱ्यां घटनास्थळी बोलवून सदर रोख रक्कम सिलबंद करून जप्त करण्यात आली असल्याची माहिती
भिवंडी पुर्व विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णयअधिकारी अमित सानप व सहाय्यक पोलीस आयुक्त सांगळे यांनी दिली.मात्र या कारवाई संदर्भात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.

भिवंडी विधानसभा मतदारसंघात निवडणूकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी विविध युक्त्या लढविल्या जात आहेत.त्यामुळे पोलीस व निवडणूक यंत्रणा सतर्क झाली आहे.ग्रामीण व शहरातील प्रवेशद्वारावर वाहणाची तपासणी करण्यासाठी केंद्र निर्माण करून तपासणी पथक तैनात करण्यात आली आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी पथकाकडून तपासणी व चौकशी केली जात आहे. असे असतानाच शहरातील धामणकर नाका परिसरात सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांनी मे.सीएमएस या कंपनीची रोख रक्कम घेवुन जाणारी गाडी (क्र. एमएच 43 /हिपी/7920 ) ही काल सोमवार (दि.4) सायंकाळी 7:45 वा.अडवून तपासणी केली असता गाडीत रोख रक्कम आढळून आली त्यामुळे संबंधीत गाडी चालकास गाडीतील रोख रक्कमेबाबत विचारणा केली असता सदर रोकड ही मे. सीएमएस या कंपनीची असल्याचे नमुद केले पण रक्कमेबाबत पुरावे व रोख रक्कम हाताळणी क्युआर कोड सादर करता आला नाही.त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी अमित सानप यांचेशी दुरध्वनीवरुन संपर्क साधुन माहिती दिली त्यामुळे त्यांनी तात्काळ एफएसटी पथकाचे हेमंत पष्टे यांना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले त्यामुळे त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त पूर्व विभाग याच्या कार्यालयात पथकासह धाव घेऊन गाडीत असलेल्या बॅग मधील व एटीएम मशिन मध्ये भरावयाच्या सिल ट्रे मधील रोख रक्कमेची गणना केली असता त्यामध्ये एकुण दोन कोटी 30 लाख 17 हजार 600 रुपये रोख रक्कम आढळून आली.त्यामुळे पवन कौशिक आयकर निरीक्षक (अन्वेषण शाखा,कल्याण) आचारसंहिता पथक प्रमुख सुधीर गुरव व सहाय्यक खर्च निरीक्षक शरद यादव यांचे समक्ष पंचनामा पूर्ण करून सदर सर्व रक्कम जप्त करून सदर रक्कम सिलबंद करुन भिवंडी कोषागार विभागात जमा करण्यात आली आहे. याबाबत आयकर विभाग अधिक तपास करून अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती भिवंडी पुर्व विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णयअधिकारी अमित सानप यांनी दिली.