भिवंडीत रेझिंग डे निमित्त भव्य संवाद मेळावा संपन्न
भिवंडी ( शरद भसाळे )ज्येष्ठ नागरिक हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्याही वेगवेगळ्या समस्या अडचणी आहेत, त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाच्यावतीने त्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेऊ आणि त्यांना पोलीस यंत्रणेचा माध्यमातून भक्कम आधार देण्याचे काम यापुढे पोलीस यंत्रणा यंत्रणा मार्फत करणार असुन तसे पोलिसांचे वतीने कार्य सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आयोजित कार्यक्रमात दिली.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत ” रेझिंग डे ” सप्ताह निमित्ताने पोलीस दलाच्यावतीने
विविध उपक्रम राबविण्यात येत असुन त्या अंतर्गत भिवंडी पोलिस उपाआयुक्त परिमंडळ 2 वतीने भादवड येथील कै.संपदा नाईक सभागृहात जेष्ठ नागरिक संवाद मेळावा व विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर आज शनिवार सकाळी आयोजित करण्यात आले होते. प्रसंगी व्यासपीठावर पोलीस आयुक्त डुंबरे,अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख,भिवंडी पोलिस उपाआयुक्त डॉ मोहन दहीकर, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयंत सोनटक्के अदि व्यासपीठावर उपस्थित होते.वय वाढत आहे त्यामुळे भविष्यात जेष्ठ नागरिक 70 वर्षांवर जाणार आहे.जेष्ठ नागरीकांच्या समस्या वेगळ्या आहे त्या हळूवार पद्धतीने हाताळण्याची गरज आहे.त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या संपलेल्या नसतात.

अशा वेळी एकटे राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.घरात कामाला ठेवणाऱ्या व्यक्तींची पोलिसांकडून पडताळणी करण्याची गरज आहे.जेष्ठ नागरिकांची सेवा करणे हे पोलिसांसाठी कर्तव्य व पुण्यांचे काम आहे त्यामुळे पोलिस दलाच्या माध्यमातून त्यांना चांगले सहकार्य व मदत देऊन विश्वास देण्याचं काम पोलीस प्रशासनाकडून केलं जात आहे असल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी यावेळी दिली.
चौकट
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस ( रेझिंग डे) सप्ताह सध्या सुरू असून या निमित्ताने विविध सेवाभावी उपक्रम भिवंडी पोलीस प्रशासना कडून राबवले जात आहेत अशी माहिती भिवंडी पोलिस उपाआयुक्त डॉ मोहन दहीकर यांनी यावेळी दिली.
सायबर क्राईम ऑनलाईन फसवणूक वाढली आहे होणारी फसवणूक टाळणे व सावधगिरी बाळगणे
याबाबत पोलिस निरीक्षक अतुल अडूरकर यांनी माहिती दिली.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक देशमुख यांनी केले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक व महिलावर्ग उपस्थित होते.