प्रजासत्ताक दिना निमित्त भारतमातेचे पुजनासह भिवंडीत ध्वजारोहण समारंभ सोहळा उत्साहात संपन्न

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या निमित्ताने शहरातील स्व.आनंद दिघे चौकात आमदार महेश चौगुले यांच्या पुढाकाराने भारतमाता पुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रसंगी यावेळी गुणवंत विद्यार्थी व नागरिकांचा प्रांत अधिकारी अमित सानप, तहसीलदार अभिजित खोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रसंगी भाजपा,
शिवसेना,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.


         दरम्यान प्रजासत्ताक दिना निमित्त सकाळी महापालिका व पोलीस उपाआयुक्त कार्यालय,न्यायालय व विविध राजकीय पक्ष कार्यालय व चौघुले विधी महाविद्यालय अशा विविध ठिकाणी ध्वजारोहणचा कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी नागरिकांसह राजकीय पक्षांचा पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.


         भिवंडी महापालिकेचे प्रांगणात सकाळी अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके यांच्या उपस्थितीत आयुक्त अजय यांच्या  हस्ते ध्वजारोहण झाले.
प्रसंगी पालिका अधिकारी व कर्मचारी,माजी नगरसेवक उपस्थित होते.तसेच यावेळी ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ दिंडी काढण्यात आली.तर प्रांत कार्यालय व बालसुधारगृहात उपविभागीय अधिकारी अमित सानप,बालसुधारगृह सचिव दिलीप कलंत्री व सदस्य अदि उपस्थित होते.तर भिवंडीतील जिल्हा व सत्र अतिरिक्त न्यायालयात न्यायाधीश श्री.एन.एल.काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष दिनेश्वर पाटील,अदि मान्यवर वकील व मान्यवर न्यायाधीश  उपस्थित होते.
अंजूरफाटा येथील स्व.महादेव चौघुले महाविद्यालय प्रांगणात विश्वस्त इंद्रपाल चौघुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी संस्थाप्रमुख सुभाष चौघुले यांच्यासह संस्था विश्वस्थ,प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते तसेच तहसील कार्यालय तहसीलदार अभिजित खोले,
पोलीस उपाआयुक्त कार्यालय प्रांगणात डीसीपी डॉ.मोहन दहीकर,भाजप कार्यालय अध्यक्ष हर्षल पाटील,
पद्मानगर येथे मनपा सभागृह नेते सुमित पाटील,तर काँग्रेस पक्ष कार्यालय अध्यक्ष रशिद ताहीर मोमीन हस्ते ध्वजारोहण चा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह मान्यवर नागरिक या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते विविध शाळा व महाविद्यालयात सुद्धा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *