भिवंडी शिवसेना तालुका प्रमुखपदी 
करसन ठाकरे यांची नियुक्ती

भिवंडी

 भिवंडी ( प्रतिनिधी ) आगामी होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने भिवंडी लोकसभा मतदार संघात जोरदार मोर्चा बांधणी सुरू केली असुन पक्षातील निष्ठावंत कार्यकर्तेना पदांचे वाटप सुरू झाले असुन शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भिवंडी शिवसेना तालुका प्रमुखपदी करसन ठाकरे व तर भिवंडी – शहापूर जिल्हाप्रमुख पदी कुंदन पाटील यांची नियुक्ती पक्ष कार्यालयातून करण्यात आली आहे.त्यामुळे शिवसैनिकां मध्ये आनंदाची लाट उसळली असुन नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
       भिवंडी तालुक्यात शिक्षण क्षेत्रात व सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून काम करणारे शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते करसन ठाकरे यांच्यावर भिवंडी तालुका प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यांच्या पत्नी दर्शना करसन ठाकरे या सेनेच्या जिल्हा परिषदेच्या माजी सभापती आहे.
तर कुंदन पाटील यांची भिवंडी शहापूर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.तर युवा सेनेचे राजू भाऊ चौधरी यांची
भिवंडी शहापूर विधानसभा जिल्हा समन्वयक तर सहसमन्वयक पदावर प्रवीण पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.या सोबत प्रसाद पाटील यांची भिवंडी शहरप्रमुख पदी पुनः नियुक्ती करण्यात आली असुन महानगर प्रमुखपदी अरुण पाटील, लोकसभा समन्वयकपदी हनुमान पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्ती नंतर सर्वांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.यावेळी खासदार संजय राऊत,शिवसेना नेते कृष्णकांत कोंडलेकर,
उपनेते विश्वास थळे,
भिवंडी खासदार सुरेश (बाळामामा) म्हात्रे, जिल्हा सचिव जय भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *