भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरातील नारपोली परिसरात असलेल्या सोलंकी प्रोसेस मिल या कपड्यावर रंगकाम करणाऱ्या डाईंग कारखान्यात मध्यरात्री उशिरा बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर भिषण आग लागली. झालेल्या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला आहे.या दुर्घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशामकदलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रासायनिक द्रव्य मिश्रित पाण्याचा मारा करीत ही आग दोन तासात आटोक्यात आणून विजवली आहे.पोलिसांनी याआगी संदर्भात नोंद घेऊन चौकशी तपास सुरू केला आहे भिवंडी शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग कारखाने व कापडावर रंगकाम करणारे डाईंग कारखाने असून आग प्रतिबंधक यंत्रणा नसल्यामुळे वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत असतात. याबाबत अनेक वेळा महापालिका व राज्य शासनाकडून जनजागृती केली जाते मात्र त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केल्यामुळे आगीच्या दुर्घटनेत कामगारांचा मृत्यू व जखमी होण्याचे प्रकारे होत असतात.

शहरातील नारपोली परिसरात असलेल्या सोलंकी प्रोसेस मिल या कपड्यावर रंगकाम करणाऱ्या डाईंग कारखान्यात मध्यरात्री उशिरा बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर भिषण आग लागली.त्यामुळे परिसरात राहणारे नागरिक व कामगारांनी रस्त्यावर धाव घेऊन आग विझविण्यासाठी धावपळ सुरू केली मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने नागरिकांनी पोलीस व भिवंडी पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना या घटनेची माहिती देतात जवानांनी दोन फायरगाड्यासह घटनास्थळी दाखल होत त्यांनी दोन तासात बॉयलर स्फोटा मुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.आगीचे कारण स्पष्ट झाले नसून भोईवाडा पोलिस या घटनेची नोंद घेत.चौकशी करीत आहेत.दरम्यान या दुर्घटनेत लालचंद यादव हा कामगार भाजल्याने जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.