भिवंडीत कचऱ्याला लागलेल्या आगीत कार जळून खाक

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील जब्बार कंपाऊंड येथे मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता.त्याच्या दुर्गंधीने परिसरातील नागरिक हैराण झाले असताना या साचलेला कचरा अज्ञाताने जाळला.कचरा पेटत असताना त्याचे आगीचे धग त्या ठिकाणी उभ्या करून ठेवलेल्या कार (गाडी)  पर्यंत पोहचल्याने या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे.ही आग मोठ्या प्रमाणावर पसरू लागल्याने स्थानिक नागरिकांनी भिवंडी महापालिकेच्या अग्निशामक दलास आगीच्या घटनेची माहिती दिली.त्यामुळे अग्निशामक दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र तो पर्यंत आगीत कार मात्र जळून खाक झाली होती.सदर आगीच्या भक्क्षस्थानी पडलेली गाडी कुणाची होती याबाबत माहिती मिळाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *