भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी वकील संघटनेतर्फे भिवंडीतील सत्र न्यायालयीन इमारतील तृतीय मजल्याचा लोकार्पण सोहळा काल सोमवारी सायंकाळी मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या परवानगीनुसार मोठ्या उत्साहात संपन्न झाला.ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश एस.बी.
अग्रवाल यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
भिवंडी ठाणे महामार्गावरील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचे शेजारी भिवंडी न्यायालयाची अत्याधुनिक अशी प्रशस्त इमारत असुन तेथे सर्व न्यायालयीन कामकाज येथे सुरळीतपणे सुरू असुन या इमारतीच्या तृतीय मजल्याचा लोकार्पण सोहळा सोमवारी सायंकाळी ठाणे जिल्हा सत्र न्यायधीश एस.बी.अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.


प्रसंगी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.
एल.काळे,न्या.एन.के.
करांडे, महाराष्ट्र अँण्ड गोवा बार असोसिएशनचे सदस्य अँड.गजानन चव्हाण,जेष्ठ वकील अँड.प्रमोद पाटील,
भिवंडी वकील
संघटनेचे माजी अध्यक्ष
अँड.नारायण अय्यर,
अँड.मनजीत राऊत,
अँड.हर्षल पाटील,
अँड.शिरीष बोरकर,
अँड.किरन चन्ने,भिवंडी वकील संघटनेचे अध्यक्ष दिनेश्वर पाटील,
अँड.सुयोग म्हात्रे,
अँड. कल्पेश पाटील,
अँड.अब्दुल बाकी,
अँड.गणेश काबुकर,
अँड.सुनील पाटील,
अँड.सिध्दी पाटील
यांच्या सह मान्यवर न्यायधीश व वकील संघटनेचे पदाधिकारी, सदस्य,महिला वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
भिवंडी बाल सुधारगृहात असलेल्या
बाल न्याय मंडळ कक्षाचे नुतनीकरण करण्यात आले असुन त्याचे उद्घाटन जिल्हा सत्र न्यायाधीश एस.बी.अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी न्यायधिश एस.बी.घुटे, बालसुधारगृहाचे सचिव दिलीप कलंत्री यांच्या सह कर्मचारी वर्ग उपस्थित होते. उपस्थित होते.