मुंबई – सर्व राजकीय पक्ष व सर्व जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचे
बिगुल वाजले आहे.सण 2024 च्या मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन अखेर जाहीर झाल्या आहेत.त्यामुळे भाजपा, काँग्रेस,शिवसेने सह सर्व पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत मतदान होणार असून तर 4 जूनला निकाल लागणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.मतदानापासून निकालापर्यंत 46 दिवस लागणार आहेत. लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.
देशात लोकसभेच्या ५४३ जागांच्या निवडणुकीसाठी १९ एप्रिल,२६ एप्रिल , ७ मे,१३ मे , २० मे, २५ मे व १ जून या ७ टप्यात मतदान होणार तर महाराष्ट्रात ५ व्या टप्प्यात ४८ मतदासंघात ७,मे,१३ मे ,२० मे रोजी मतदान होणार, संपूर्ण देशातील सर्व जागांवरचा निकाल ४ जूनला जाहीर होणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.सार्वत्रिक लोकसभा निवडणूक -2024 साठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे मतदानाचा
पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा – 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा – 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा – 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा – 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे.
