भिवंडी पालिकेचे माजी महापौर  विलास पाटील विधानसभेच्या रिंगणात..

भिवंडी पालिकेचे माज संवाद साधत मोर्चा बांधणी सुरू.   भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी विविध पक्षांची मोर्चा बांधणी सुरू झाली असतानाच कोणार्क विकास आघाडीचे अध्यक्ष व भिवंडी महापालिकेचे माजी महापौर विलास पाटील हे भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.त्यामुळे त्यांनी विविध पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन […]

Continue Reading

वऱ्हाळा तलाव तुडुंब भरून वाहू लागला

भिवंडीतील  रहिवासी नागरिकांना दिलासा.   भिवंडी  (भानुदास भसाळे ) भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारा वऱ्हाळा तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहू लागला आहे.त्यामुळे समाधान व्यक्त केले जात असले तरी लाखो लिटर पाणी नाले गटारात वाहून जात असल्याने सर्व सामान्य स्थानिक नागरिक व माजी नगरसेवकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.भिवंडी महापालिका आयुक्त प्रशासनाने तलावाची खोली वाढवून […]

Continue Reading

घरफोडी,मोटारसायकल चोरी प्रकरणी दोघांना अटक

भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त      भिवंडी ( बी.एस ) भिवंडी शहर परिसरात मोटारसायकल व घरफोडी चोरी चे भयंकर प्रकार होत असुन पोलीस यंत्रणा होणाऱ्या घटनांना पायबंद घालण्यासाठी सतर्क झाली आहे. भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करणाऱ्या भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या विशेष […]

Continue Reading

भिवंडीतील कपिल पाटील फाउंडेशनच्यावतीने पंढरपूरला महाआरोग्य सेवा शिबीर संपन्न,पाच हजार वारकऱी रूग्णांनी घेतला लाभ.

भिवंडी ( बी.एस. ) आषाढी एकादशीनि मित्ताने पायी दिंडी सोबत चालणारे वारकरी संप्रदाय नागरिक व भिवंडीतील भाविकांसाठी कपिल पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुमित पाटील यांच्या पुढाकाराने पंढरपूर येथे महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. दोन दिवसापासून सुरू असलेल्या या शिबिरात प्रथमोपचा केेंद्रातून तज्ञ डॉक्टर माफँत रूग्णांची तपासणी करून औषध वाटप करण्यात आली. सुमारे पाच […]

Continue Reading

मुसळधार पावसामुळे भिवंडीतील पुरजन्य परिस्थिती. निजामपूरा पोलीस ठाण्यात पाणी शिरले

खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात गेल्या 36 तासा पासुन पडत असलेल्या मुसळधार रिमझिम पावसामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे रहिवासी नागरिक व रस्त्यालगत असलेल्या दुकानात पावसाचे व गटार नाल्याचे पाणी शिरल्याने  दुकानदारांचे नुकसान झाल्याचे दुकानदारांनी सांगितले,निजामपूरा पोलीस ठाणे चौकीत सुध्दा नाल्याचे पाणी शिरल्याने पोलिसांची तारांबळ उडाली […]

Continue Reading

मुंबई नाशिक महामार्गाची जिल्हाधिकारी,ठाणे सहपोलीस आयुक्तांनी केली पाहणी

वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी..   भिवंडी (प्रतिनिधी) मुंबई नाशिक महा मार्गावरील खड्डे व ब्रिजच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी संबंधित ठेकेदार यांना दिल्या.          यावेळी ठाणे सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण,ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.डी.एस. स्वामी,महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस […]

Continue Reading

पिसाळलेल्या कुत्र्याचा भिवंडीत हैदोस, महिन्याभरात 886 जणांना घेतला चावा,

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यामुळे शालेय विद्यार्थी सह जेष्ठ नागरिक व मोटरसायकली स्वारांचे प्राण धोक्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांत 100 अधिक लोकांना भटक्या कुत्र्यानी दंश (चावा) केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.शांतीनगर, ब्राह्मण आळी, बाजारपेठ, कामतघर, दरगाह रोड, धामणकर नाका, पद्मानगर अशा […]

Continue Reading

खड्ड्यांमुळे भिवंडीतील रस्त्यांची झाली चाळण,दोन दिवसात खड्डयात 15 दुचाकी चालक धडपडले

भिवंडी ( बी.एस  ) भिवंडी शहर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असुन शहर परिसरात खराब रस्त्यामुळे वाहतूक कोंडी चा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या सहा महिन्यापूर्वी डांबरीकरण करून पँच वर्क करून बनविण्यात आलेल्या शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरातील विविध भागातील मुख्य व अंतर्गत रस्त्यां वर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले […]

Continue Reading

भिवंडीचा प्रवास गोदामनगरीतून विकसित शहराच्या दिशेने..

  `भूमी वर्ल्ड’च्या पुढाकाराने बीकेसीच्या धर्तीवर कॉर्पोरेट कार्यालये   भिवंडी (बी.एस.)आशियातील सर्वात मोठी गोदामनगरी असलेल्या भिवंडी शहर व तालुक्याचा प्रवास आता गोदामनगरीतून विकसित शहराच्या दिशेने सुरू झाला आहे. मुंबईतील `बीकेसी’च्या धर्तीवर रांजणोली येथे कॉर्पोरेट कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. भिवंडी शहरातील हा सर्वात मोठा कमर्शियल टॉवर असेल, अशी माहिती `भूमी वर्ल्ड’चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पटेल […]

Continue Reading

यंत्रमागांना 15 मार्चपासून अतिरिक्त वीज अनुदान मिळणार –  वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील 

  भिवंडीत टोरंट कंपनीला पर्यायी वीज कंपनी देणार   भिवंडी (भानुदास भसाळे ) राज्यातील यंत्रमागांना जाहीर केलेले अतिरिक्त वीजदर सवलत अनुदान 15 मार्च 2024 पासून मिळणार असून त्यासाठीची ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच भिवंडी मध्ये टोरंट कंपनीच्या मनमानीला चाप लावण्यासाठी दुसऱ्या कंपनीला वीज पुरवठ्याचा परवाना देण्यात येईल अशी घोषणा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत […]

Continue Reading