काँग्रेस उमेदवार दयानंद चोरघे यांच्या प्रचारासाठी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन भिवंडीतील रस्त्यावर उतरले..

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार दयानंद चोरघे यांचा प्रचार जोमामध्ये सुरू असून काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांच्या नेतृत्वखाली पक्षाचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचार सभेमध्ये व पदयात्रा मध्ये सहभागी होत आहेत,आज रविवारी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार व भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन […]

Continue Reading

जातीपातीचे राजकारण न करता भिवंडीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा उमेदवाराला मतदान करा – खासदार रवी किशन यांचे आवाहन

भिवंडी ( प्रतिनिधी ) मतदारांनी जातपात न पाहता भिवंडीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमी तत्पर असलेले लोकप्रिय भाजप महायुतीचे उमेदवार महेश चौघुले यांना मतदान करून विकास काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे गोरखपुर येथील खासदार व चित्रपट अभिनेता रवी किशन यांनी भिवंडीत आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत केलेभिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान […]

Continue Reading

भिवंडीत एमआयएम पक्षाने समाजवादी पक्षाच्या उमेदवारांला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे अधिकृत उमेदवार अडचणीत..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजप,काँग्रेस,समाजवादी पक्ष व अपक्ष उमेदवारां मध्ये प्रचार सभा व पदयात्रा काढून मतदार संघातील मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे या मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी जोमात सुरू झाली असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत असे असतानाच आज रविवार  दुपारी अचानकपणे एमआय एमपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भिवंडी पश्चिम […]

Continue Reading

भिवंडीतील महायुतीचे उमेदवारांना विजयी करण्याचे राजस्थानच्या  मुख्यमंत्र्यांनी केले केले आवाहन.

भिवंडी  (प्रतिनिधी) काँग्रेस पक्ष हा  भ्रष्टाचाऱ्यांची जननी आहे आणि तिच्याशी निगडित लोक भ्रष्ट आहेत.ज्याप्रमाणे राजस्थानमध्ये मतदारांनी भाजप पक्षाला बहुमत देऊन विकास काम करण्याची संधी दिली त्याच प्रमाणे महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतदान करून बहुमतानी विजयी करून राज्यात पूर्ण बहुमताने भाजप महायुतीचे सरकार स्थापन करा असे आवाहन राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी भिवंडीत झालेल्या प्रचार सभा […]

Continue Reading

भिवंडी निर्भय वातावरणात मतदान व्हावे यासाठी पोलिसांचा रूट मार्च

उत्तराखंडचे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात.. भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी पूर्व विधानसभा आणि भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात आगामी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका लक्षात घेऊन निवडणूक विभाग व पोलीस प्रशासनाच्यावतीने सतर्कपणे कामकाज सुरू झाले आहे,येत्या 20 नोव्हेंबर बुधवारी विविध मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया होणार असल्यामुळे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी भिवंडी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा […]

Continue Reading

शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या  नेतृत्वाखाली भिवंडी सह ठाणे जिल्ह्यात  प्रचाराचा झंझावात सुरू झाला

शांताराम मोरे विजयाची हॅट्रिक करतील विश्वास व्यक्त केला. भिवंडी ( प्रतिनिधी  ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामाचा ध्यास घेतला असून महायुतीचे सरकार आल्यानंतर भिवंडी शहर व ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार उमेदवार शांताराम मोरे यांना […]

Continue Reading

भिवंडी पुर्व विधानसभा मतदार संघ कार्यक्षेत्रात फिरणाऱ्या वाहनातून 2 कोटी 30 रुपयांची रोकड जप्त..

निवडणूक विभागव सहाय्यक पोलीस आयुक्तांची धडक कारवाई. भिवंडी ( प्रतिनिधी ) ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम जमामध्ये वाजू लागले असून निवडणूक यंत्रणा व पोलीस अथक सतर्क होऊन काम करू लागले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे. होणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष […]

Continue Reading

लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याना जोडा दाखवा – एकनाथ शिंदे चे आवाहन

भिवंडी ( शरद भसाळे ) लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टात जात आहे, शासकीय योजना बंद करण्यासाठी खटाटोप करीत आहेत. शासकीय योजनांना खोडा करणाऱ्या विरोधकांना मतदार व लाडक्या बहिणींनी या निवडणुकीत जोडा दाखवावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी  भिवंडीत झालेल्या प्रचार सभेत केली आहे.भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार […]

Continue Reading

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात छाननीत

17 उमेदवारांचे अर्ज उमेदवार वैध..तर भिवंडी पश्चिम मतदारसंघात 26 अर्ज वैध.. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे पडघम जोमामध्ये वाजू लागले असून भाजप, शिवसेना,काँग्रेस, समाजवादी सह अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरून प्रचाराची रणनीती सुरू केली आहे 137 – भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज बुधवार (दि.30) […]

Continue Reading

भिवंडीत पोलीस, निवडणूक भरारी पथकाची धडक कारवाई तीन लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

भिवंडी (प्रतिनिधी ) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोमात वाजत असुन पोलीस व निवडणूक यंत्रणा सतर्कपणे काम करीत आहे. निवडणूक पार्श्वभूमीवरठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे व ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शना खाली ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची पोलीस व निवडणूक भरारी पथकाकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. 136 भिवंडी पश्चिम विधानसभा निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी […]

Continue Reading