भिवंडीत नवीन मतदार झालेल्या युवकांना मार्गदर्शन मेळावा संपन्न

भिवंडी  ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगा कडून मोठ्या प्रमाणावर विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.भिवंडी पश्चिम विधानसभा अंतर्गत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रमांतर्गत स्विप कक्ष भिवंडी यांच्या मार्फत बी.एन.एन महाविद्यालय येथे मतदार जनजागृती अंतर्गत मतदार झालेल्या युवकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन  करण्यात […]

Continue Reading

भिवंडीत शिवजयंती निमित्त भव्य  मिरवणुक, हजारो शिवभक्त सहभागी..

भिवंडी ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार साजरी होणारी शिवजयंती भिवंडी शहर परिसरात मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.या निमित्त शहरातील ठिकठिकाणी शिवचरित्रावर आधारीत भव्य देखावे उभारण्यात आले होते.कोंबडपाडा शिवसेना शाखा,टिळक चौक,कामतघर,वाणी आळी,कासार आळी, काप आळी, पद्मा नगर, ब्राह्मणाळी,शिवाजी नगर,नवीचाळ,कुंभार आळी,खोणी गांव या भागातून विशेष सजावट करून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.यावेळी […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष
आक्रमक.उमेदवारी मिळवण्यासाठी दयानंद चोरघे ची धावपळ सुरू.

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार सहा वेळा विजयी झालेला आहे.त्यामुळे हा मतदार संघ काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ असून पक्षश्रेष्ठींनी हा मतदार संघ काँग्रेस पक्षाकडेच असावा अशी कडक भूमिका घ्यावी अशी आक्रमक मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे विविध जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली असून याबाबत […]

Continue Reading

महिलांनी पारंपरिक वेषभूषा करून  भिवंडीत होळया प्रज्वलीत केल्या,तरूणाईने रंगाने भरलेल्या प्लास्टिकच्या थैल्या फोडत धुळवड केली साजरी..

भिवंडी (भानुदास भसाळे )भिवंडी शहर व परिसरांत रविवारी सायंकाळी होळी प्रज्वलन आणि आज सोमवार रोजी धुळीवंदनाचा रंगोत्सवाचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात व आनंदात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.प्लास्टिक बंदी असताना सुध्दा अनेक ठिकाणी रंगाने भरलेले फुगे व छोटय़ा प्लास्टिकच्या थैल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करीत पालिकेच्या आवाहनाला तिलांजली देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या सणाचा पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार […]

Continue Reading

देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक..सर्वांनी आपले मतभेद दूर ठेऊन कामाला लागा – खा.श्रीकांत शिंदे 

भिवंडी (प्रतिनिधी )प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षात केलेली प्रगती पुढे भविष्यात ही सुरू रहावी यासाठी ही निवडणूक महत्वाची असून,देशाचे भविष्य घडवणारी व देशाला दिशा देणारी,देशाला पुढे घेऊन जाणारी आहे त्यामुळे सर्वांनी आपले मतभेद दूर ठेऊन महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणे महत्वाचे आहे असे मत शिवसेनेचे कल्याण चे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले.  भिवंडीतील […]

Continue Reading

होळी,धुलीवंदन शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी  भिवंडीत केला रूटमार्च

भिवंडी ( प्रतिनिधी ) आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव,धुलीवंदन व होळीचा सण आनंदात व उत्साहात संपन्न होण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्कपणे काम करीत असून नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून व कायद्याचे पालन करून हे धार्मिक उत्सव व सण संपन्न करावे असे आवाहन ठाणे सह पोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी भिवंडीत रूट मार्च प्रसंगी केले आहे. मुस्लिम […]

Continue Reading

भिवंडीतील राहनाळ गावातील जिल्हा परिषद शाळेत इकोफ्रेंडली होळी धुळवड

भिवंडी ( प्रतिनिधी ) भारतीय संस्कृतीतील सण समारंभ उत्सव म्हणजे आनंदाचा ठेवा.सध्याच्या बदललेल्या पर्यावरणाच्या वातावरणामध्ये नैसर्गिक आणि इकोफ्रेंडली होळी साजरी करणे ही काळाची गरज ठरत आहे.त्यामुळे आज भिवंडी तालुक्यातील राहनाळ गांव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली होळी व धुळवड साजरी करून आनंदोत्सव साजरा केला.  भिवंडी ठाणे महामार्गावरील राहनाळ गांव येथील शाळेत होळी व धुळवड […]

Continue Reading

मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात भिवंडीत गुन्हा दाखल..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य विविध प्रकारचे नामांकित खाद्यपदार्थ विक्री होत असून त्यामुळे मानवाच्या आरोग्यास बाधा पोहचत आहे.याबाबतअन्न व औषध प्रशासन सुरक्षा विभागाकडे आलेल्या तक्रारीवरून त्यांनी भिवंडी शहरातील खाडीपार खोणी परिसरात मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करीत पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. निलेश पटेल,मिसबाउल फेजुल हक व […]

Continue Reading

संस्कृतीचे पालन करून सण उत्सव
साजरे करावेत – श्रीकांत परोपकारी

भिवंडीत पोलीस शांतता समीती सदस्यांची बैठक संपन्न. भिवंडी ( भानुदास भसाळे ) येणारा काळ हा सण उत्सवाचा आहे.त्यामुळे आपल्या संस्कृतीचे पालन करून सर्वांनी धार्मिक सण – उत्सव साजरे करावेत सण हे आनंद व स्फूर्ती देणारे असतात त्यामुळे त्याचा आनंद लुटावा इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे असे मत भिवंडी पोलीस […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज…
मतदारांची संख्या 20 लाखावर गेली..

भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी लोकसभा क्षेत्रातील 6 म्हणजे प्रत्येक विधानसभा निहाय 9 असे 54 भरारी पथके 24 तास कार्यरत राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.तसेच यंदा भिवंडी लोकसभा मतदारसंघात 20 लाख 39 हजार 449 मतदार यांची नोंद करण्यात […]

Continue Reading