अतिवृष्टीचा विचार करून  ठाणे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा: दयानंद चोरघे यांची मागणी

भिवंडी (भानुदास भसाळे ) ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवस सतत मुसळधार पाऊस पडल्याने अनेक भागात पुरजन्य परिस्थिती उद्भवली आहे.या पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी शेतात शिरून शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत.अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी,शहापूर, मुरबाड,कल्याण,अंबरनाथ तालुक्यातील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.ठाणे जिल्ह्यातील सध्याची सर्व परिस्थिती पाहता […]

Continue Reading

भिवंडीचा नागरी शहर म्हणून विकास करणार – देवेंद्र फडणवीस

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या दहीहंडी उत्सवाला उपस्थिती भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी शहराचे चित्र बदलण्याचे काम महायुतीचे सरकार करणार असून, एक नागरी शहर म्हणून भिवंडी शहराचा सर्वागीण विकास करण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे मनोरे लावून हंडीतील लोणी शेवटच्या घटकांपर्यंत पोचविणार […]

Continue Reading

भिवंडी गुन्हे शाखेची धडक कारवाईत
31 कोटी रुपयांचे १६ किलो मेफेड्रोन पावडरसह दोघे गजाआड…

  बीएमडब्ल्यू आणि स्विफ्ट डिझायर कार देखील जप्त केली भिवंडी (शरद भसाळे ) ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार बेकायदेशीर व अवैद्य धंदे करणाऱ्या विरोधात भिवंडी पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे असे असताना भिवंडी शहर.परिसरात ड्रग्जची तस्करी आणि विक्री करणाऱ्यां दोन सराईत दोन गुन्हेगारांना भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांचा विशेष पोलीस […]

Continue Reading

जिल्हापरिषदेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे -भिवंडी तालुका प्रमुख करसन ठाकरे यांचे आवाहन…

भिवंडीत शिवसेनेची मोर्चा बांधणी सुरू. भिवंडी ( शरद भसाळे ) ठाणे जिल्हा व विशेष करून भिवंडी हा शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला आहे.याचे महत्त्वाचे कारण म्हणजे येथील शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे,स्व. आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली काम करून पक्ष वाढवून मजबूत केला आहे.गत जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार घवघवीत यश मिळवून विजयी […]

Continue Reading

भिवंडीतील गोदाम पट्ट्यात अग्निशमन केंद्र उभारण्यास शासनाकडून दिरंगाई

कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर वसूली मात्र सुविधा नसल्याने नाराजी..भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट मालाची साठवणूक करणारी गोदाम आहेत. या गोदामा मध्ये फर्निचर, इलेक्ट्रॉनिक सामान, कपडा आणि रासायनिक ज्वलनशील पदार्थ व इतर मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते मात्र गोदाम चालक व मालक वर्गाकडून अनेक वेळा गोदाम सुरक्षितता बाळगण्यास […]

Continue Reading

भिवंडीत संत नामदेव महाराज 675 वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

भिवंडी ( शरद भसाळे ) श्री.संत शिरोमणीनामदेव सेवा प्रतिष्ठान व नामदेव शिंपी समाजाच्यावतीने श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा आज मंगळवार दुपारी भिवंडी व संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठ्या भक्तिमय  उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.या निमित्ताने सर्वत्र भजन,प्रवचन किर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव आणि […]

Continue Reading

जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भिवंडीत शिवसेनेची मोर्चा बांधणी सुरू..

————-भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहा – देवानंद थळे भिवंडी ( शरद भसाळे ) ठाणे जिल्हा परिषद व ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया राज्य शासन आदेशानुसार महसूल विभागाने सुरू केल्याने काँग्रेस,भाजप,शिवसेनेने पक्ष,कार्यकर्तेचे बैठका सुरू केल्या आहेत,शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी यांनी सुद्धा निवडणूका लक्षात घेऊन कशेळी गांव येथील शिवसेना पक्ष कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची […]

Continue Reading

भिवंडीतील ८१ ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत संपन्न

उपविभागीय अधिकाऱ्यासह विविध राजकीय पक्षांचे सरपंच सदस्य उपस्थित. भिवंडी (शरद भसाळे )महाराष्ट्रात नगरपालिका,महानगर पालिका, जिल्हापरिषद,व ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असुन निवडणूक आयोग व राज्य शासनाच्या आदेशानुसार आरक्षण सोडतीचे कार्यक्रम महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले असुन आज भिवंडीत उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार अभिजित खोले यांच्या उपस्थितीत सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व […]

Continue Reading

मुंबई-नाशिक रस्त्याच्या दुरवस्थेबाबत भिवंडी खासदारांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका..

————-टोल वसुली ची चौकशी करण्याची केली मागणी. भिवंडी (प्रतिनिधी ) मुंबई नाशिक या महामार्गावर सुरू असलेले रस्ता रुंदीकरण व खराब झालेल्या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.हा रस्ता दुरुस्त करणे कंत्राटदाराचे काम आहे, मात्र त्याकडे शासकीय अधिकारी व कंत्राटदार दुर्लक्ष करीत असल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी चा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.असेअसताना या […]

Continue Reading

भंगार सामान गोळा करताना रेकी करून घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास भिवंडी पोलिसांनी मध्य प्रदेशातून केली 
अटक

————-सहा लॅपटॉप हस्तगत भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील विविध भागात फिरून भंगार सामान गोळा करत असतानाच बंद असलेल्या घर आणि दुकानांची रेकी करून तेथे घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोरट्यांस पोलिसांनी मोठ्या शिताफीने माग काढून मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याने परिसरात केलेल्या घरफोडीतील एक लाख रुपये किमंतीचे सहा लॅपटॉप पोलिसांनी हस्तगत केले असल्याची […]

Continue Reading