शांतीदुत परिवार संस्थेच्यावतीने सचिन खेडेकर,समीर चौघुले,विशाखा सुभेदार यांना सेवा रत्न पुरस्कार..

भिवंडी ( शरद भसाळे ) संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्य करणाऱ्या ” शांतीदुत परिवार ” या संस्थेच्या माध्यमातून नुकताच महाराष्ट्राची हास्यजत्रा व सम्या सम्या मैफिलीत माझ्या ” फेम सुप्रसिद्ध सिने अभिनेते समीर चौघुले यांचा कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत असल्यामुळे “शांतीदूत सेवा रत्न”पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.त्यामुळे मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.    महाराष्ट्र शांतीदूत परिवाराचे संस्थापक […]

Continue Reading

भिवंडी महापालिका आयुक्त प्रशासनाने वाढीव मालमत्ता कर रद्द करावी,शिवसेनेचा माजी  उपमहापौरांनी केली
मागणी.

————— भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहर महानगर पालिका आयुक्त प्रशासनाने लोकप्रतिनिधी व सर्व सामान्य नागरिकांना विश्वासात न घेता घरपट्टी व पाणीपट्टी मालमत्ता करात मनमर्जी करून मोठया प्रमाणात वाढ केली आहे त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे अर्थिक बजेट कोसळल्याने महिला व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.त्यामुळे आयुक्तांनी लोकभावनेचा आदर करून  मालमत्ता कर वाढ तात्काळ कमी […]

Continue Reading

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले.. 

भिवंडी मनपाच्या प्रभाग रचनेचे कामकाजाला सुरवात.  भिवंडी ( शरद भसाळे ) विधानसभा निवडणुकी नंतर प्रतीक्षेत असलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या हालचालीला राज्याच्या प्रशासकीय पातळीवरून सुरुवात झाली असून “ड ” वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्या बाबतचे आदेश-२०२५ भिवंडी महानगरपालिकेस आज(११जुलै) रोजी मिळाले आहेत. त्यानुसार पालिकेच्या निवडणुक कार्यालयात कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु झाली असून शासन निर्देशानुसार भिवंडी महानगर पालिकेच्या नवीन […]

Continue Reading

भिवंडी शहर-ग्रामीण दाखले धारक झाले हैराण..

नायब तहसीलदाराने दिलेले 133 जन्म-मृत्यूचे दाखले रद्द.. भिवंडी  (प्रतिनिधी )  भिवंडी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांनी दिलेले दाखले अचानकपणे रद्द करण्यात आल्याने महानगरपालिका हद्दीत आणि ग्रामीण मधील ग्रामपंचायत हद्दीत रहाणाऱ्या दाखले धारक हैराण झाले आहे.तसेच पुन्हा नव्याने या दाखल्यासाठी कागदपत्रे सादर करावे लागणार असल्याने पुन्हा संबंधित कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. तसेच या दाखल्याचा केलेल्या वापरावर देखील […]

Continue Reading

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघा जणांच्या टोळीला भिवंडी पोलिसांनी केली अटक. चारपिस्टलसह, बी.एम.डब्लू कार जप्त,

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या टोळीला शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या विशेष पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्या जवळून पोलिसांनी एक बीएमडब्ल्यू कार,दोन गावठी कट्टा,दोन पिस्टल असा एकूण सुमारे 17 लाख 35 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत […]

Continue Reading

डी.वाय.फाऊंडेशन च्या माध्यमातून  10,12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा दयानंद चोरघे यांच्या हस्ते गुणगौरव सोहळा भिवंडीत संपन्न..

भिवंडी (शरद भसाळे) 10 व 12 वी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थीना शालेय उपयोगी वस्तू त्याचबरोबर शैक्षणिक दाखले,आधारकार्ड वाटप करण्याचा कार्यक्रम डी.वाय.फाउंडेशनचे प्रदेशध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या उपस्थितीत भिवंडीत करण्यात आला, यावेळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी व पालक वर्ग,जेष्ठ नागरिक,शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होतेरायगड व  ठाणे जिल्ह्यात सामाजिक कार्य करणाऱ्या डी.वाय.फाऊंडेशनचे […]

Continue Reading

भिवंडीत भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन करण्यासाठी सन्मान तिरंगा रँली संपन्न…

भिवंडी ( प्रतिनिधी ) पाकिस्तानात घुसून तेथील अतिरेक्याचे तळ उध्वस्त करण्या साठी राबवण्यात आलेल्या “ऑपरेशन सिंदूर ” ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारतीय सशस्त्र दल सैन्याचे अभिनंदन  करण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र भाजपाच्यावतीने सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे,याचाच एक भाग म्हणून काल सायंकाळी भिवंडीत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष रवींद्र सावंत व आमदार महेश चौघुले यांच्या नेतृत्वाखाली धामणकर […]

Continue Reading

भिवंडी तालुक्यातील 121 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत संपन्न..

राजकीय पक्षाच्या कार्यकर्तेची गर्दी. भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीच्या आरक्षणाची सोडत  मंगळवारी दुपारी शहरातील कामतघर येथील महा पालिकेच्या वऱ्हाळ माता मंगल कार्यालय याठिकाणी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी भाजप,काँग्रेस, शिवसेना,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस सह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित […]

Continue Reading

युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांना संरक्षणासाठी भिवंडीत ” मॉक ड्रिल “

सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज. भिवंडी ( शरद भसाळे  ) काश्मीर पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या लष्करी जवानांनी अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंन्दुर ही विशेष मोहीम राबवून यशस्वी कारवाई व्दारे प्रतिउत्तर दिले आहे. पाकिस्तान कडून येणार ड्रोन हल्ले नष्ट करीत भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत ड्रोन हल्ले सुध्दा नष्ट करीत आहेत. त्यामुळे सध्या सिमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे केंद्र व […]

Continue Reading

भिवंडी गुन्हे शाखेची धडक कारवाई 
45 लाखाच्या बनावट नोटासह 6 जण गजाआड

लँपटाँप,प्रिंटर सह साधन सामुग्री जप्त. भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात असलेल्या अवचित पाडा या भागात बनावट नोटा आपल्या कब्जात बाळगून त्यांची खऱ्या नोटांशी अदलाबदल करण्यासाठी आलेल्या टोळीला भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या पथकाने चार दिवसापूर्वी सुमारे 30 लाख रुपयांची रोकड, मोबाईल फोनसह  ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी […]

Continue Reading