भिवंडीत प्रतिबंधित 41 लाखांचा गुटखा कंटेनर सह केला जप्त…पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

 भिवंडी (प्रतिनिधी )महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा शेजारील पर राज्यातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक करून भिवंडी शहर ग्रामीण भाग परिसरात आणून त्याची गोदामात गुपचूप साठवणूक करून सदरचा गुटखा माल भिवंडी,कल्याण, मुंबई ,ठाणे नवी मुंबई व पालघर जिल्हा परिसरात विक्रीत केला जात आहे.अशाच पद्धतीने परराज्यातून ट्रक मधून आणलेला सुमारे 40 लाख 80 हजार किमतीचा गुटखा व पंधरा […]

Continue Reading

भिवंडीत यंत्रमाग कारखाना  कोसळल्याने तीन कामगार जखमी..

भिवंडी  (प्रतिनिधी )भिवंडी शहरातील फंडोले नगर परिसरात पहाटेच्या सुमारास धोकादायक झालेला यंत्रमाग कारखाना कोसळल्याने झालेल्या भिषण दुर्घटनेत तीन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. या मध्ये एका कामगाराची तब्येत गंभीर असल्याने त्यास मुंबई येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते. भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याचे हद्दीतील फंडोले नगर परिसरातील रेहमान कंपाऊंड येथे धोकादायक ठरवण्यात आलेले 2450 […]

Continue Reading

भिवंडीत काँग्रेस पक्षाचे माजी 
नगरसेवकाचे गाडीची तोडफोड

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिकेचे काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक प्रशांत लाड यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कार वर मध्यरात्रीच्या सुमारास मोटरसायकल वर आलेल्या चार जणांच्या टोळक्याने हातोड्याने हल्ला चढवीत नुकसान केले आहे.या धाडसी घटनेमुळे परिसरातभितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी गंभीर दखल घेत प्रशांत लाड यांनी तातडीने  शांतीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन शिरीष फडतरे व […]

Continue Reading

भिवंडीत भिषण आगीत भंगाराची दुकाने जळून खाक..

भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी तालुक्यातील ओवळी गाव परिसरातील मैदानात असलेल्या भंगाराच्या दुकानांना मध्यरात्रीच्या सुमारास भिषण आग लागल्याने परिसरातील रहिवासी नागरिकांना मध्ये मोठी धावपळ उडाली होती.पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सुमारे आठ तास रासायनिक द्रव्य मिश्रीत पाण्याचा मारा करून ही आग विजवली आहे.आगीने रौद्र रूप धारण केल्याने या आगीत 10 ते 15  दुकाने भस्मसात […]

Continue Reading

50 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा भरवला सातवीचा वर्ग,शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा..

भिवंडी ( प्रतिनिधी ) शिक्षणाची ओढ ही नेहमी आनंददायी व आयुष्यात स्मरण देत आपले जीवन उज्वल घडवणारी असते. शिक्षण घेत असताना आपल्या सोबत मैत्री करून मार्गदर्शन करणारे काही जिवलग मित्रही जोडले जातात शिक्षण क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर हे मित्र अनेक वेळा उद्योग व्यवसाय नोकरीच्या भूमिकेतून अन्य ठिकाणी निघून जातात काही मित्र हे आपल्या आठवणी कायम असतात […]

Continue Reading

भिवंडीत ट्रक चालकास मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी केले गजाआड.

भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी ठाणे महामार्गावरील रस्त्यावर सकाळच्या सुमारास ट्रक चालकावर हल्ला चढवत त्याला लुटणाऱ्या चार जणांच्या चौकडीस भिवंडी कोनगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करीत अवघ्या 24 तासात ताब्यात घेऊन अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून अद्याप काही गुन्हे उघडकीस येतात का याची सखोल चौकशी सुरू केली आहे.     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाशिक मार्गावरील भिवंडी […]

Continue Reading

भिवंडीत नवीन मतदार झालेल्या युवकांना मार्गदर्शन मेळावा संपन्न

भिवंडी  ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगा कडून मोठ्या प्रमाणावर विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.भिवंडी पश्चिम विधानसभा अंतर्गत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रमांतर्गत स्विप कक्ष भिवंडी यांच्या मार्फत बी.एन.एन महाविद्यालय येथे मतदार जनजागृती अंतर्गत मतदार झालेल्या युवकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन  करण्यात […]

Continue Reading

भिवंडीत शिवजयंती निमित्त भव्य  मिरवणुक, हजारो शिवभक्त सहभागी..

भिवंडी ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार साजरी होणारी शिवजयंती भिवंडी शहर परिसरात मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.या निमित्त शहरातील ठिकठिकाणी शिवचरित्रावर आधारीत भव्य देखावे उभारण्यात आले होते.कोंबडपाडा शिवसेना शाखा,टिळक चौक,कामतघर,वाणी आळी,कासार आळी, काप आळी, पद्मा नगर, ब्राह्मणाळी,शिवाजी नगर,नवीचाळ,कुंभार आळी,खोणी गांव या भागातून विशेष सजावट करून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.यावेळी […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष
आक्रमक.उमेदवारी मिळवण्यासाठी दयानंद चोरघे ची धावपळ सुरू.

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार सहा वेळा विजयी झालेला आहे.त्यामुळे हा मतदार संघ काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ असून पक्षश्रेष्ठींनी हा मतदार संघ काँग्रेस पक्षाकडेच असावा अशी कडक भूमिका घ्यावी अशी आक्रमक मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे विविध जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली असून याबाबत […]

Continue Reading

महिलांनी पारंपरिक वेषभूषा करून  भिवंडीत होळया प्रज्वलीत केल्या,तरूणाईने रंगाने भरलेल्या प्लास्टिकच्या थैल्या फोडत धुळवड केली साजरी..

भिवंडी (भानुदास भसाळे )भिवंडी शहर व परिसरांत रविवारी सायंकाळी होळी प्रज्वलन आणि आज सोमवार रोजी धुळीवंदनाचा रंगोत्सवाचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात व आनंदात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.प्लास्टिक बंदी असताना सुध्दा अनेक ठिकाणी रंगाने भरलेले फुगे व छोटय़ा प्लास्टिकच्या थैल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करीत पालिकेच्या आवाहनाला तिलांजली देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या सणाचा पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार […]

Continue Reading