भिवंडीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट
मनपा निर्बिजीकरण प्रकल्प बंद..

भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी शहर महानगर पालिकेचा कार्यक्षेत्रातभटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने शालेय विद्यार्थी सह नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत.महापालिकेच्या आयुक्त प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कुत्र्यां वरील निर्बिजीकरणाचा प्रकल्प गेल्या काही वर्षापासून बंद अवस्थेत आहे.त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत असून श्वानदंश होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.त्यामुळे सर्व सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.आयुक्तांनी याबाबत लक्ष्य दयावे अशी मागणी […]

Continue Reading

आरटीओ मधील लिपिकाच्या कारभाराची चौकशी करणेचे मुख्यमंत्री सचिवालयाचे निर्देश

भिवंडी ( प्रतिनिधी ) राज्य शासनाच्या परिवहन विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई येथील लिपिक कर्मचारी भागवत देवकर यांची सखोल चौकशी करून त्यांचे विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सचिवालय कक्षा कडून नवी मुंबईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांना दिले आहेत.त्यामुळे कार्यालय कर्मचाऱ्यांना मध्ये भितीचे वातावरण निर्माण […]

Continue Reading

भिवंडीत जायट्स ग्रुप तर्फे महिलांनी काढली जनजागृती मोटरसायकल रॅली..

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहरात सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या जायंटस ग्रुप ऑफ भिवंडी,सहेली जायंटस ग्रुप ऑफ भिवंडी मेट्रो सहेली जायंटस ग्रुप ऑफ भिवंडी व युथ या ग्रुप संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अवयव दान करा पाणी बचत व बेटी बचाव अशा विविध लोक उपयोगी व पर्यावरण संरक्षण बाबत जनजागृती करण्यासाठी महिलांनीचेवतीने […]

Continue Reading

शासन आपल्या दारी उपक्रमात भिवंडी भाजपा शाखेकडून 250 महिलांना शिधावाटप पत्रिकेचे वितरण

  भिवंडी ( प्रतिनिधी ) शिधावाटप कार्यालयात मोठ्या प्रमाणात गलथान व भ्रष्ट कारभार सुरू असल्याची ओरडहोत आहे. तसेच शिधापत्रिका काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थ कारण सुरू असुन कार्यालयात करण्यासाठी दलालांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाला असुन नागरिकांना दिलासा देण्यासाठी भिवंडी भाजपा पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी यांनी पुढाकार घेत शासन आपल्या […]

Continue Reading

संत नामदेव मंदिर उभारणी शुभारंभ आमदार चौघुले यांच्या हस्ते संपन्न

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील ठाणगे आळी बाजारपेठेत असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिराच्या इमारत मंदिर उभारणीचा शुभारंभ आमदार महेश चौगुले यांच्या शुभहस्ते मोठ्या जल्लोषात करण्यात आला.याप्रसंगी महापालिकेचे माजी सभागृह नेते सुमित पाटील,नगरसेवक गजानन शेटे,प्रदिप राका,महेश जगताप, हभप गणेश पुलकंठवार,वास्तु विशारद सुशील सोमानी,समाज अध्यक्ष महेंद्र माडकर,भानुदास भसाळे,विश्वस्थ नंदकुमार वेल्हाळ यांच्यासह मान्यवर नागरिक महिला […]

Continue Reading

भिवंडीतील राहनाळ ग्रामपंचायती च्या वतीने महिलादिनी उद्योजक महिलांचा सन्मान 

भिवंडी ( प्रतिनिधी ) महीला दिनाचे औचित्य साधून भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित महिला सक्षमीकरण कार्यक्रमात गावातील मनीषा दीपक भोईर, मंथना वसंत पाटील या उद्योजक महिलांचा सन्मान सरपंच प्रियांका पाटील, माजी पंचायत समिती सभापती ललिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच चरणी पाडा या भागात स्टेम प्राधिकरणाकडून नव्याने पाईप लाईन टाकून पाणी योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी […]

Continue Reading

वासिंदच्या वाढत्या लोकसंख्येनुसार
प्रवाशांना सुविधा देणार : कपिल पाटील

रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे लोकार्पण पडघा– ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळील वासिंद गांव परिसराची वाढत्या लोकसंख्येनुसार रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांना सुविधा देण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्याचबरोबर भविष्यात लोकलच्या फेऱ्या निश्चितच वाढतील, असे आश्वासन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी झालेल्या कार्यक्रमात दिले.       वासिंद रेल्वे स्थानकात उभारलेल्या रेल्वे पादचारी पुलाचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील […]

Continue Reading

महाशिवरात्री निमित्त भिवंडीत हरहर महादेवाचा जयघोष,  पालखी सोहळा संपन्न झाला

भिवंडी (शरदभसाळे)  भिवंडी शहर परिसरात भगवान महादेवाचा महाशिवरात्रौ उत्सव मोठया  उत्साहातसंपन्न झाला.या निमित्त रामेश्वर मंदिरात महाप्रसाद, भजन,प्रवचन,किर्तन सारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंदिरास आकर्षक विध्युत रोषणाई व फुलांचे डेकोरेशन करून सजविण्यात आले होते.त्यामुळे भाविकांनी सकाळी श्री.रामेश्वर पिंडीला अभिषेक व दर्शना साठी मंदिरात पहाटे गर्दी केली होती. हरहर महादेवाचा घोषणा व शंंखनाद करीत काप […]

Continue Reading

भिवंडीत संकेत भोसले हत्यकांड,वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले कुटुंबियांच्या सांत्वन

  भिवंडी ( प्रतिनिधी )14 फेब्रुवारी रोजी भिवंडीतील कामतघर भागातील वराळदेवी येथे राहणारा संकेत भोसले या शालेय विद्यार्थीस बेदम मारहाण झाली होती.या मारहाणीत मुंबई केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.मृत्यूनंतर आंबेडकरी समाजात तीव्र असंतोष पसरला असून संकेत भोसले यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने आंदोलने व मोर्चा […]

Continue Reading

भिवंडीत कचरा समस्येबाबत भाजपा आक्रमक,पालिका प्रवेशद्वारावर कचरा फेक आंदोलन..

पालिका अधिकारी व पोलिसांची धावपळ उडाली. भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी शहर महानगर पालिका हद्दीतील कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचा रद्द केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्या मुळे शहरातील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी जमा झाले आहेत नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. कचऱ्याला दुर्गंधी सुटल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे याबाबत महापालिका […]

Continue Reading