भिवंडीतील कचरा उचलण्यात कुचराई  करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका अखेर रद्द ,नव्या ठेकेदार शोध सुरू..

भिवंडी ( प्रतिनिधी )  भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील दररोज जमा होणारा शेकडो टन कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारा कडून टाळाटाळ केली जात होती. ठेकेदाराकडून काम होत असलेल्या कुचराई मुळे शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. शहरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर तसेच शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असल्याने पालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला असल्याने अखेर पालिका आयुक्त […]

Continue Reading

गणवेश योजनेच्या कापड खरेदीचे टेंडर रद्द करा – आमदार रईस शेख यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

ठाणे – (प्रतिनिधी ) मुंबई राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ४० लाख ६० हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेसाठी कापड खरेदीबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्यावतीने १३८ कोटी रुपयांचे नुकतेच टेंडर काढले आहे. या टेंडरमध्ये गुजरात व राजस्थानच्या कापड उत्पादकांना अनुकूल अशा अटी- शर्ती टाकण्यात आल्या आहेत अशी माहिती  […]

Continue Reading

भिवंडी गुन्हे शाखेच्या कारवाईत दोन गुन्ह्यांची उकल,दीड लाखांचे मोबाईल; साडेसात लाखांचा टेम्पो जप्त

भिवंडी( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील मोबाईल चोरीच्या घटना वाढत असताना,भिवंडी गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले असून त्यामध्ये दीड लाखांचे आठ मोबाईल व टेम्पो व त्यामधील माल असा साडे सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्यात दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास समांतर गुन्हे शाखा करीत असताना […]

Continue Reading

टोरेंट पॉवर कंपनी तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्युत सुरक्षा जनजागृती शिबीर

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीच्यावतीने शहरातील येथील अमजदिया उर्दू प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात “विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धन” व विज संरक्षण या विषयावर जनजागृती मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात शेकडो विद्यार्थांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन वीज पुरवठा व सुरक्षा संदर्भात माहिती अवगत करून घेतली. […]

Continue Reading

भिवंडीत शाळेतील विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्या विषयी महिला न्यायाधीशांनी केले मार्गदर्शन 

भिवंडी ( प्रतिनिधी )शालेय विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यां बाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने भिवंडी शहरातील धामणकर नाका भागातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी  भिवंडी न्यायालयातील दिवाणी सह न्यायाधीश क स्तर श्रीमती एस.व्ही.साळवी व श्रीमती पी.के.कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर प.अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती […]

Continue Reading

भिवंडीत भंगार गोदामाला भीषण आग,आगीत वाहने जळून खाक. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात असलेल्या ठाकराचा पाडा येथील एका भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत गोदाम व नजीक असलेल्या वाहन पार्किंग मधील अनेक वाहनांना झळ लागल्याने वाहन व मालमत्तेचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन चार तास पाण्याचा मारा करीत […]

Continue Reading

भिवंडीतील चौघुले लॉ कॉलेज मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

भिवंडी – भिवंडी शहरातील स्व.महादेव चौघुले महाविद्यालय संचालीत इंद्रपाल चौघुले लाँ काँलेज महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेऊन पारितोषिक मिळवली. चौघुले महाविद्यालयात लाँ (कायदा) चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव देण्यासाठी प्राचार्य गायत्री पाटील यांच्या संकल्पनेतून तीन दिवस मनोरंजनात्मक खेळ,नृत्य स्पर्धा गायन स्पर्धा,शायरी, मेहंदी, रांगोळी, […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिका लवकरच नागरिकांच्या सोयीसाठी १०० इलेक्ट्रिक प्रवासी बस चालवणार..

 भिवंडी: (भानुदास भसाळे) भिवंडी शहर परिसरात महानगर पालिका प्रशासनाची ” सीटी बस ” सेवा नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते गेल्या अनेक वर्षापासून महापालिका प्रशासन अर्थसंकल्पामध्ये बस सेवा सुरू करणार असे आश्वासन देत होती मात्र त्याची पूर्तता होत नव्हते मात्र आता केंद्र सरकारच्या सहकार्याने महानगरपालिके मार्फत भिवंडी शहरात सिटी बस (प्रवासी बस) चालवण्याचे […]

Continue Reading

भिवंडीत  सिलेंडरचा स्फोट झाल्याने भिषण आग, नागरिकांना ची धावपळ उडाली

भिवंडी – भिवंडी शहरातील आदर्श पार्क येथील मातीची मडकी विकणाऱ्याच्या दुकान असणाऱ्या मोकळ्या जागेत मंगळवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.या आगीत त्यालगत असलेल्या झोपडीत असलेला  सिलेंडर गँसचा भिषण स्फोट झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.आगीच्या ज्वाळा इतरत्र पसरल्याने एक मोटरसायकल आगीच्या भक्क्षस्थानी पडली तर एक इसम जखमी झाला आहे.या आगीची माहिती स्थानिक […]

Continue Reading

गणेश जन्मोत्सव भिवंडीतील गणपती मंदिरात उत्साहात संपन्न.ठिकठिकाणी विद्युत रोषणाईने केली सजावट

भिवंडी ( भानुदास भसाळे  ) भिवंडी शहर परिसरात असलेल्या गणपती  मंदिरात आज दुपारी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात संपन्न झाला. यावेळी महिलांनी पाळण्यात बाल गणेश मुर्ती ठेऊन गायण करीत गजाननाचा जयघोष केला यावेळी उपस्थित महिलांसह नागरीकांनी गणपती मूर्ती वर पुष्पवुष्टी केली.यावेळी उत्साही भक्तांनी मंदिरा समोर जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली.     गणेश जयंती निमित्त […]

Continue Reading