भिवंडीतील लोनाड येथील गोदाम संकुल नाल्यात बिबट्या अडकला..

पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू.. भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी तालुक्यातील मौजे लोनाड गावाच्या हद्दीतील पॅरामाउंट लॉजीट्रेड गोदाम संकुलातील नाल्यात मध्ये बिबट्या अडकून पडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती वनविभागाचे अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी सापळा घेऊन धाव घेत बिबट्या ला पकडण्या साठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.रात्री याच परिसरात बिबट्या आला असता आई एकवीरा […]

Continue Reading

खोपोली व भिवंडीत घरफोडी चोरी करणाऱ्या दोघा अट्टाल आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले गजाआड

3  लाखांचा मुद्देमाल हस्तगत भिवंडी ( प्रतिनिधी ) रायगड जिल्हयातील खोपोली व भिवंडी शहर परिसरात चोरी,घरफोडी करून पाणी वापरासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रीक मोटर, एक्साईट कंपनीच्या बॅट-या व अँल्युमिनियम स्कॅप मालाची चोरी करणाऱ्या टोळीला भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करीत दोघांना अटक केली आहे.त्याच्या कडून सुमारे तीन लाख 63 हजार 489 रूपये किमंतीचा मुद्देमाल पोलिसांनी […]

Continue Reading

भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून भाजपाचे एक लाख सदस्यनोंदणीचे लक्ष्य – कपिल पाटील

माजी केंद्रीय राज्यमंत्रीचे उपस्थितीत बैठक संपन्न भिवंडी  (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता नोंदणी अभियानाला भिवंडी ग्रामीण मतदारसंघात उत्साहात सुरुवात झाली असून, या मतदारसंघात भाजपाची एक लाख सदस्यनोंदणी करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. तसेच याबाबत पाटील यांनी विशेष बैठक घेऊन सदस्यता नोंदणी अभियान यशस्वी करण्याचा […]

Continue Reading

नामदेव शिंपी समाजाचा राज्यस्तरीय वधू वर मेळावा कल्याण येथे संपन्न..

भिवंडीतील मंदिराचे मदतीसाठी कार्यक्रम.. भिवंडी (बी.एस) ठाणे जिल्ह्यातील एकमेव असलेल्या भिवंडी शहरातील बाजारपेठ ठाणगे आळी येथे असलेल्याविश्व संत शिरोमणी नामदेव महाराज या मंदिरा चा जीर्णोद्धार करण्यात येत आहे.त्या निमित्ताने कल्याण येथील सभागृहात राज्यस्तरीय वधू व वर पालक संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या संमेलनात भिवंडी कल्याण, मुंबई नाशिक पुणे, ठाणे डोंबिवली व अहमदाबाद सह […]

Continue Reading

मुंबई दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या पोलिसांना रक्तदान करून भिवंडीत वाहण्यात आली आदरांजली

भिवंडी ( भानुदास भसाळे  )मुबंईत 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भिवंडी पोलीस उपाआयुक्त व शांतता समिती सदस्य, नागरीकांनी रक्तदान व पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम  भिवंडी पोलीस उपाआयुक्त कार्यालयाचा प्रांगणात आज सकाळी संपन्न झाला.या वेळी पोलीस अधिकाऱ्यासह महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच या वेळी संविधान दिना निमित्त पोलीस उपाआयुक्तांनी सविधान वाचन करून […]

Continue Reading

भिवंडी नामदेव महाराज मंदिर जीर्णोद्धारासाठी नामदेव शिंपी समाजाचेवतीने कल्याण येथे 
राज्यस्तरीय वधू व वर पालक मेळावा आयोजन

भिवंडी ( बी.एस. )  ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात असलेल्या एकमेव संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नामदेव शिंपी समाजाचेवतीने कल्याण येथे भव्य राज्यस्तरीय वधू व वर पालक मेळावा संमेलन आयोजित करण्यात आला आहे त्यामुळे समाज बांधवांनी या संमेलन कार्यक्रम मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे जिल्हा नामदेव शिंपी उन्नती मंडळ व भिवंडी नामदेव […]

Continue Reading

काँग्रेस उमेदवार दयानंद चोरघे यांच्या प्रचारासाठी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन भिवंडीतील रस्त्यावर उतरले..

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार दयानंद चोरघे यांचा प्रचार जोमामध्ये सुरू असून काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांच्या नेतृत्वखाली पक्षाचे मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचार सभेमध्ये व पदयात्रा मध्ये सहभागी होत आहेत,आज रविवारी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार व भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन […]

Continue Reading

जातीपातीचे राजकारण न करता भिवंडीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा उमेदवाराला मतदान करा – खासदार रवी किशन यांचे आवाहन

भिवंडी ( प्रतिनिधी ) मतदारांनी जातपात न पाहता भिवंडीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमी तत्पर असलेले लोकप्रिय भाजप महायुतीचे उमेदवार महेश चौघुले यांना मतदान करून विकास काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे गोरखपुर येथील खासदार व चित्रपट अभिनेता रवी किशन यांनी भिवंडीत आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत केलेभिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान […]

Continue Reading

भिवंडीत एमआयएम पक्षाने समाजवादी पक्षाच्या उमेदवारांला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे अधिकृत उमेदवार अडचणीत..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजप,काँग्रेस,समाजवादी पक्ष व अपक्ष उमेदवारां मध्ये प्रचार सभा व पदयात्रा काढून मतदार संघातील मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे या मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी जोमात सुरू झाली असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत असे असतानाच आज रविवार  दुपारी अचानकपणे एमआय एमपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भिवंडी पश्चिम […]

Continue Reading

भिवंडीतील महायुतीचे उमेदवारांना विजयी करण्याचे राजस्थानच्या  मुख्यमंत्र्यांनी केले केले आवाहन.

भिवंडी  (प्रतिनिधी) काँग्रेस पक्ष हा  भ्रष्टाचाऱ्यांची जननी आहे आणि तिच्याशी निगडित लोक भ्रष्ट आहेत.ज्याप्रमाणे राजस्थानमध्ये मतदारांनी भाजप पक्षाला बहुमत देऊन विकास काम करण्याची संधी दिली त्याच प्रमाणे महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतदान करून बहुमतानी विजयी करून राज्यात पूर्ण बहुमताने भाजप महायुतीचे सरकार स्थापन करा असे आवाहन राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी भिवंडीत झालेल्या प्रचार सभा […]

Continue Reading