भिवंडीत पोलिसां कडून चोरीस गेलेला एक कोटी 43 लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना हस्तांतरण..

भिवंडी ( प्रतिनिधी  ) पोलीस स्थापना दिनानिमित्ताने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात पोलीस दलाच्यावतीने ” रेझिंग डे “सप्ताह सुरू आहे.या निमित्ताने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन पोलीस प्रशासना कडून केले जात आहे.याचाच एक भाग म्हणून नागरिकांचा चोरीस गेलेला मुद्देमाल गुन्हेगारां कडून जप्त करून तो पुन्हा नागरिकांना सुपूर्द करण्यात येत आहे.यावेळी विविध पोलीस […]

Continue Reading

बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या भिवंडीतील कार्यक्रमात विभूती घेण्यासाठी  नागरिकांची चेंगराचेंगरी, कार्यक्रम अर्ध्यावर सोडून धिरेंद्र शास्त्री परतले..

भिवंडी ( प्रतिनिधी ) बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र कृष्णजी शास्त्री यांच्याभिवंडी तालुक्यातील  हायवे दिवे गांव येथील कार्यक्रमात विभूती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाल्याने कार्यक्रमात प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यामुळे धीरेंद्र शास्त्री कार्यक्रमास्थळी नाराज होत कार्यक्रम स्थळ अर्ध्यावर सोडून निघून गेले आहेत.सुदैवाने पोलिसांनी गर्दी पांगवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.याबाबत पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.     आज शनिवारी […]

Continue Reading

ज्येष्ठ नागरिक समाजाचा महत्वाचा घटक त्यांची काळजी घेण्याची गरज -आशुतोष डुंबरे

भिवंडीत रेझिंग डे निमित्त भव्य संवाद मेळावा संपन्न भिवंडी ( शरद भसाळे )ज्येष्ठ नागरिक हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत त्यांच्याही वेगवेगळ्या समस्या अडचणी आहेत, त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाच्यावतीने त्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेऊ आणि त्यांना पोलीस यंत्रणेचा माध्यमातून भक्कम आधार देण्याचे काम यापुढे  पोलीस यंत्रणा यंत्रणा मार्फत करणार असुन तसे पोलिसांचे […]

Continue Reading

भिवंडीत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या विरोधात पोलिसांनी केली 92 जणांवर धडक कारवाई..

भिवंडी ( प्रतिनिधी )सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण स्तुत्य उपक्रम राबवतात तर काही जण मौजमजा करण्यासाठी मद्यपानाला महत्त्व देत असतात.दारू पिऊन वाहन चालवू नका असे आवाहन पोलिसांनी केले असताना सुध्दा शासकीय नियमांचे उल्लंघन केले जाते त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलिसांना विशेष […]

Continue Reading

भिवंडीत नवर्षाचे औचित्य  साधून दिंडीगडावर स्वच्छता मोहीम..

भिवंडी (प्रतिनिधी) नववर्षाचे औचित्य साधत व सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्व.डॉ.श्री.नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचेवतीने भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील श्री.क्षेत्र दिंडेश्वर महादेव मंदिर दिंडीगड येथे आज सकाळी विशेष महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली स्थानिक ग्रामस्थासह शेकडो श्री सदस्यांनी सहभाग घेतला.    पद्मश्री पुरस्कार सन्मानित स्वच्छतादुत डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालीहा उपक्रम राबविण्यात आला.भिवंडी तालुक्यातील सोनाळे गांव […]

Continue Reading

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी 
यांना भिवंडीतील रूग्णालयातून डिस्चार्ज

भिवंडी ( शरद भसाळे ) गेल्या काही दिवसांपासून माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती बरी नसल्याने ते  भिवंडीतील रुग्णालयात उपचारा साठी दाखल झाले होते त्यांच्यावर यशस्वीरित्या चांगले उपचार झाल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली त्यामुळे आज दहा दिवसानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक जानेवारी रोजी दुपारी त्यांना डॉक्टरांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. […]

Continue Reading

क्रिकेट सामाजिक एकता जोडणारा खेळ – निलेश चौधरी

भिवंडीत धर्मराजा चषक स्पर्धेला जल्लोषात सुरुवात.. भिवंडी ( प्रतिनिधी ) क्रिकेट हा जगामध्ये सुप्रसिद्ध असलेला खेळ आहे या खेळाच्या माध्यमातून सामाजिक व जातीय एकता निर्माण होत असते खेळाच्या माध्यमातून अनेकांना शासकीय नोकरी मिळते तसेच त्यांचे जीवन हे उज्वल झालेले आहे.त्यामुळे खेळाला शासकीय व सामाजिक संस्थांनी जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे मत भिवंडी महापालिकेचे जेष्ठ […]

Continue Reading

स्व.मीनाताई ठाकरे रंगायतन कुलूप बंद असल्याने भिवंडीतील नाट्य रसिकांमध्ये नाराजी

ठेकेदार,मनपा प्रशासनाचेही दुर्लक्ष भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगरपालिका प्रशासनाने  शहरातील नागरिकांसाठी उभारलेलेस्व.मीनाताई ठाकरे रंगायतन दुरुस्ती अभावी कुलूप बंद केल्याने नाटयप्रेमी रसिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील दोन वर्षांपासून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रंगायतनाच्या दुरुस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नाट्य रसिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. रंगायतन दुरुस्ती कामात हलगर्जी पणा होत असल्यामुळे येथील […]

Continue Reading

18 तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर बिबट्या भिवंडीत जेरबंद झाला..

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील मौजे लोनाड गावाच्या हद्दीतील शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पॅरामाउंट लॉजीट्रेड गोदाम संकुलातील नाल्या मध्ये बिबट्या अडकून पडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती.त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.या घटनेची माहिती मिळाल्यावर पडघा पोलिस व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते.बिबट्या ला जेरबंद करणे कठीण असल्याचे निदर्शनास येताच मुंबई बोरिवली येथील संजय गांधी […]

Continue Reading

भिवंडी प्रांत, तहसीलदार कार्यालयाची बेकायदेशीर रेती उत्खनन करणाऱ्या विरोधात धडक कारवाई

18 लाखांचे सक्शन पंप,बार्ज केले नष्ट करीत गुन्हा दाखल केला. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील काल्हेर, कशेळी ते दिवे अंजुर या खाडीपट्ट्यातील नदी खाडीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे शासकीय नियमांचे उल्लंघन करून रेती उत्खनन सुरू आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा तलाठी व मंडळ अधिकाऱ्याकडे तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष केले जात असल्याने याबाबत भिवंडी उपविभागीय अधिकारी […]

Continue Reading