भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच सराईत गुन्हेगारांना अटक करून तीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला..

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहर परिसरात मोबाईल चोरी,सोन्याचे दागिने व घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या विशेष पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीवरून तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करीत सराईत गुन्हेगार असलेल्यापाच आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे.त्यांच्याकडून दोन दुचाकी स्कुटर,सात मोबाईल फोन,सोन्याचे दागिने,व इतर चोरी केलेला किमंती ऐवज असा […]

Continue Reading

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भिवंडीत शिवसेनेचा भव्य मेळावा संपन्न.

महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहा – देवानंद थळे भिवंडी ( शरद भसाळे ) आगामी ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूका शिवसेना भाजप महायुतीच्या माध्यमातून लढविण्यासाठी शिवसेना पक्ष सक्रिय झाला आहे.गांव पातळीवर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढविण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत आहोत त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क करून कामाला […]

Continue Reading

मुंबई महापालिकेच्या रस्त्यावरून जड मालवाहू वाहनांची रेलचेल तात्काळ बंद करण्याची शिवसेना जिल्हाप्रमुखांची मागणी

—————पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी अपघात होण्याची भिंती..?? भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी –  ठाणे महामार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी नागरिक हैराण झाले असून वाहतूक पोलिसांकडून कोणत्याही योग्य प्रकारचे नियोजन होत नसल्याने वाहन कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी आता खाजगी हलकी वाहन व ट्रान्सपोर्टव्दारे येणाऱ्या मालाची वाहतूक करणारे जड मालवाहू वाहनांनी मुंबई महापालिकेच्या […]

Continue Reading

भिवंडीत धर्मांतराचा डाव हिंदुत्ववाद्यांनी उधळून लावला,अमेरिकन नागरिकांसह तिघा जणांना अटक..

भिवंडी ( प्रतिनिधी )ठाणे व पालघर जिल्ह्यातील पाड्या वस्तीवरील आदिवासी खेडूत्यांच्या अज्ञान व अशिक्षितपणासह गरिबीचा गैरफायदा घेत धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्याचे खळबळजनक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले असुन शासनाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन संबधीतांवर कारवाई करावी अशी मागणी होत असतानाच भिवंडी तालुक्यातील भुईशेत चिंबीपाडा गांव येथे होणाराधर्मांतराचा गंभीर प्रयत्न बजरंग […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेच्या विकास आराखडा गैरव्यवहारा बाबतीत शासनाने चौकशी करून कारवाई करण्याची आमदारांनी केली मागणी..

भिवंडी (प्रतिनिधी ) : भिवंडी- शहर महानगरपालिका हद्दीतील विकास आराखड्याबाबत (डीपी ) झालेली प्रक्रिया ही संपूर्णपणे भ्रष्टाचार, गैरव्यवहार व अपारदर्शकतेचे मूळ ठरत असल्याचा गंभीर आरोप शहरातील नागरिक आणि विविध संस्थांकडून करण्यात येत आहेत, त्यामुळे या सर्व आरोपांची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भिवंडी चे आमदार महेश चौघुले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

Continue Reading

भिवंडीतील धामणकर नाका गणेशोत्सव मंडळाने प्रथम 
गणेश दर्शनाचा सन्मान वृद्धाश्रमातील नागरिकांना दिला.

130 फूट उंचीचे इस्कॉन मंदिराची उभारणी. भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहरात एकात्मतेचा राजा म्हणून गौरविल्या जाणाऱ्या धामणकर नाका मित्र मंडळाच्या 37 व्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. मातोश्री वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक वृद्धांना प्रथम गणेश दर्शनाचा सन्मान देऊन पार विधीवत कार्यक्रमास सुरवात करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली. यंदा उत्तर […]

Continue Reading

अतिवृष्टीचा विचार करून  ठाणे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा: दयानंद चोरघे यांची मागणी

भिवंडी (भानुदास भसाळे ) ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवस सतत मुसळधार पाऊस पडल्याने अनेक भागात पुरजन्य परिस्थिती उद्भवली आहे.या पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी शेतात शिरून शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत.अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी,शहापूर, मुरबाड,कल्याण,अंबरनाथ तालुक्यातील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.ठाणे जिल्ह्यातील सध्याची सर्व परिस्थिती पाहता […]

Continue Reading

भिवंडीचा नागरी शहर म्हणून विकास करणार – देवेंद्र फडणवीस

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या दहीहंडी उत्सवाला उपस्थिती भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी शहराचे चित्र बदलण्याचे काम महायुतीचे सरकार करणार असून, एक नागरी शहर म्हणून भिवंडी शहराचा सर्वागीण विकास करण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे मनोरे लावून हंडीतील लोणी शेवटच्या घटकांपर्यंत पोचविणार […]

Continue Reading

भिवंडी गुन्हे शाखेची धडक कारवाईत
31 कोटी रुपयांचे १६ किलो मेफेड्रोन पावडरसह दोघे गजाआड…

  बीएमडब्ल्यू आणि स्विफ्ट डिझायर कार देखील जप्त केली भिवंडी (शरद भसाळे ) ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार बेकायदेशीर व अवैद्य धंदे करणाऱ्या विरोधात भिवंडी पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे असे असताना भिवंडी शहर.परिसरात ड्रग्जची तस्करी आणि विक्री करणाऱ्यां दोन सराईत दोन गुन्हेगारांना भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांचा विशेष पोलीस […]

Continue Reading

जिल्हापरिषदेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे -भिवंडी तालुका प्रमुख करसन ठाकरे यांचे आवाहन…

भिवंडीत शिवसेनेची मोर्चा बांधणी सुरू. भिवंडी ( शरद भसाळे ) ठाणे जिल्हा व विशेष करून भिवंडी हा शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला आहे.याचे महत्त्वाचे कारण म्हणजे येथील शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे,स्व. आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली काम करून पक्ष वाढवून मजबूत केला आहे.गत जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार घवघवीत यश मिळवून विजयी […]

Continue Reading