भिवंडी पालिकेत नऊ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती.कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.

भिवंडी ( प्रतिनिधी ) गेल्या महिनाभरापासून राजकीय वादग्रस्त चर्चेत राहिलेल्या भिवंडी शहर महानगर पालिकेच्या नऊ स्वीकृत सदस्य (नगरसेवक)नियुक्ती पदाची प्रक्रिया महापौर नारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष महासभेत मोठ्या उत्साहात महापालिकेच्या सभागृहात संपन्न झाली.महापौर नारायण चौधरी व आमदार महेश चौघुले यांनी नवनिर्वाचित सदस्य (नगरसेवक) यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.भिवंडी महापालिकेत महापौर,उपमहापौर व सभापती पदाच्या निवडणूक […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेच्या होणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांच्या अर्जाचीठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी.

महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे माजी अध्यक्षांची मागणी.. भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी महानगर शहर पालिकेत ९० नगरसेवक निवडून आले असून सध्या स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविले आहेत. मात्र पालिकेकडे दाखल अर्जांची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून दडवून ठेवल्याचा मुद्दा सध्या भिवंडी शहरात चर्चेचा विषय बनला आहे.पालिकेचे आजी व माजी नगरसेवक तसेच नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या या गलथान […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी साठी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी भा.का.क. महासंघ आग्रही..

भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी शहर महानगर पालिकेतीलअधिकारी आणि कर्मचारी यांना सालाबाद प्रमाणे सन २०२६ साला करीता कर्मचाऱ्यांना २०,०००/- (वीस हजार मात्र)दिवाळी सानुग्रह अनुदान रूपये मिळावेत अशी मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ युनियनचे अध्यक्ष भानुदास भसाळे, सचिव श्रीपत तांबे यांनी युनियनचे माध्यमातून महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्याकडे केली आहे. तसेच सन २०२२ मध्ये मंजूर झालेल्या सेवाशर्ती […]

Continue Reading

भिवंडीतील प.रा.विद्यालयात रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.. विद्यार्थ्यांसह पालकवर्गाची उपस्थिती..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील प.रा. विद्यालय संकुलातील पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका अनिता सुतार यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना व सर्व सामान्य नागरिकांना पौष्टिक आहारात रानभाजी चे महत्त्व कळावे आणि त्याची संपूर्ण माहिती असावी या भूमिकेतून आज शनिवार रोजी सकाळी शाळेच्या सभागृहात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, शालेय विद्यार्थी व पालकवर्गाने मोठ्या संख्येने […]

Continue Reading

ढोल ताश्याचा गजरात जल्लोषात झाले गणपती विसर्जन सोहळा भिवंडीत थाटामाटात संपन्न…

महापौर,पोलीस आयुक्तांनी केले गणेश मंडळांचे स्वागत.. भिवंडी ( शरद भसाळे ) डी.जे वाद्यास आराम देत काही गणेशोत्सव मंडळांनी बँजो व ढोल ताश्याचा आधार घेत मोरया मोरया गाण्याचे तालावर नाचत व गणपती बाप्पा मोरया व पुढच्या वर्षी लवकर या’अशा जोषपुर्ण घोषणा देत गणेश भक्तांनी 12 दिवसीय गणपती मुर्ती चे मोठ्या उत्साहात भिवंडी शहर व ग्रामीण भागातील […]

Continue Reading

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे निवासस्थानी केले गणेश दर्शन..

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहर परिसरात गणेश उत्सवाची धामधुम मोठ्या उत्साहामध्ये होत असून घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ठिकठिकाणी देखावे उभे करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सामाजिक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी श्री गणेश दर्शन घेण्यासाठी येत असून त्यांचे उत्साहामध्ये स्वागत केले जात आहे,भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात शिवसेना ठाणे […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेने तयार केले 12त्रकृत्रिम तलाव,महापौरासोबत पोलिसांनी केली विसर्जनांची स्थळांची पाहणी

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहर परिसरातसार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी जोरदार तयारी सुरू केली असुन ठिकठिकाणी मोठ्या गणेश मूर्ती आणून मंडपात विराजमान झाल्या आहेत त्यामुळे मोठे मंडप व देखावे उभारण्याचे काम सुरू आहे.गणेशोत्सव मंडळ व नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापौर नारायण चौधरी यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त प्रशासन सुसज्ज […]

Continue Reading

भिवंडीत ठिकठिकाणी दहीहंड्या फोडून युवकांनी केला जल्लोष..मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक..

भिवंडी ( शरद भसाळे ) गोविंदा रे गोपाळा अशा गगनभेदी घोषणा देत आज शनिवार (दि.6)रोजी सकाळपासून विविध गोविंदा पथक ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या उत्साहात रस्त्यावर उतरले होते, रस्त्यावरील चौकात विविध खाजगी व सार्वजनिक मंडळाच्यावतीने ठीक ठिकाणी उभारण्यात आलेल्या छोट्या मोठ्या उंचीवर असलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकातील युवकांनी आपले 5 ते 6 मानवी […]

Continue Reading

भिवंडीत लाख मोलाचा दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक सुसज्ज..

शिवसेना भाजपासह विविध सामाजिक संस्थाकडून ” हंडी महोत्सव ” आयोजन. भिवंडी (शरद भसाळे ) भिवंडी शहर परिसरात दरवर्षी सार्वजनिक दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहामध्ये व धुमधडाक्यात साजरा होत असतो, या निमित्ताने शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी खाजगी व सार्वजनिक दहीहंडी उत्सव मंडळाच्यावतीने दहीहंडी उभारण्यात येतात,त्यामुळे यंदा उत्सवासाठी मंडप,सजावट व देखावे उभारण्याची तयारी सुरू झाली आहे,येत्या शनिवार […]

Continue Reading

नशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक – आशुतोष डुंबरे

भिवंडी ( शरद भसाळे ) नशामुक्त भारत आणि नशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे.नशामुक्त मोहीम राबविण्यासाठी पोलीस प्रशासन आपल्या स्तरावर कार्य करत आहे, परंतु समाजातील सर्व सामाजिक, शैक्षणिक व सुज्ञ लोकांच्या सहभागा शिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही,अंमली पदार्थ विरोधी सुरू लढा संपूर्ण यशस्वी करण्यासाठी युवक व नागरिकांचे सहकार्य आवश्यक […]

Continue Reading