महाशिवरात्री निमित्त भिवंडीत हरहर महादेवाचा जयघोष,  पालखी सोहळा संपन्न झाला

भिवंडी (शरदभसाळे)  भिवंडी शहर परिसरात भगवान महादेवाचा महाशिवरात्रौ उत्सव मोठया  उत्साहातसंपन्न झाला.या निमित्त रामेश्वर मंदिरात महाप्रसाद, भजन,प्रवचन,किर्तन सारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंदिरास आकर्षक विध्युत रोषणाई व फुलांचे डेकोरेशन करून सजविण्यात आले होते.त्यामुळे भाविकांनी सकाळी श्री.रामेश्वर पिंडीला अभिषेक व दर्शना साठी मंदिरात पहाटे गर्दी केली होती. हरहर महादेवाचा घोषणा व शंंखनाद करीत काप […]

Continue Reading

भिवंडीत संकेत भोसले हत्यकांड,वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले कुटुंबियांच्या सांत्वन

  भिवंडी ( प्रतिनिधी )14 फेब्रुवारी रोजी भिवंडीतील कामतघर भागातील वराळदेवी येथे राहणारा संकेत भोसले या शालेय विद्यार्थीस बेदम मारहाण झाली होती.या मारहाणीत मुंबई केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.मृत्यूनंतर आंबेडकरी समाजात तीव्र असंतोष पसरला असून संकेत भोसले यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने आंदोलने व मोर्चा […]

Continue Reading

भिवंडीत कचरा समस्येबाबत भाजपा आक्रमक,पालिका प्रवेशद्वारावर कचरा फेक आंदोलन..

पालिका अधिकारी व पोलिसांची धावपळ उडाली. भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी शहर महानगर पालिका हद्दीतील कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचा रद्द केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्या मुळे शहरातील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी जमा झाले आहेत नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. कचऱ्याला दुर्गंधी सुटल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे याबाबत महापालिका […]

Continue Reading

बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी हे शासन कटिबध्द – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 ठाणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेले विकसित भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. हा देश तरुणांचा देश आहे. या तरुणांना योग्य दिशा आणि रोजगार देण्याचे काम हे शासन करीत आहे. यापुढेही करीत राहील, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी हे शासन कटिबध्द आहे, असे उद्गगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहे.ठाणे येथील मॉडेला मिल कंपाऊंड, […]

Continue Reading

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा
वाढदिवस विविध उपक्रम करीत साजरा

 भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी लोकसभा मतदारसंघांचे खासदार तथा  केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वाढदिवसानिमित्ताने सुमारे ३५ ते ४० हजारांहून अधिक नागरिकांनी त्यांची भेट घेऊन दिवसभरात अभिष्टचिंतन केले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध भागातजिल्हा परिषदेचे सदस्य देवेंश पाटील, महापालिका माजी सभागृहनेते सुमित पाटील यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम करण्यात आले. या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण मतदारसंघात […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेचा विकास दर्शक 942 कोटीचा फुगीर अर्थसंकल्प सादर

. पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणार वैद्यकीय आरोग्य सेवा सुधारणेवर भर भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी शहराचा सर्वांगीण विकास घडावा यासाठी महानगरपालिका आयुक्त प्रशासनाने आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा महापालिकेचा सन 2023- 24 चे सुधारित अंदाजपत्रक 796 कोटी 35 लाख 17 हजार मात्र तयार करण्यात आले आहे तसेच सन 24 -25 मध्ये महापालिकेचे प्रारंभिक शिल्लक 161 कोटी 97 लाख […]

Continue Reading

भिवंडीतील संकेत भोसले हत्याकांड रिपब्लिकन सेनेचा भिवंडी प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा

भिवंडी (भानुदास भसाळे)संकेत भोसले हत्याकांडाच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंगळवारी दुपारी शहरातील कामतघर ते उपविभागीय कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारो महिला,नागरिक व युवक सहभागी झाले होते.यावेळीप्रांताधिकारी यांना हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करावी याबाबत निवेदन देण्यात आले १४ फेब्रुवारी रोजी भिवंडीतील कामतघर भागातील […]

Continue Reading

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ठाणे जिल्हयात प्रथम

भिवंडी ( भानुदास भसाळे )  राज्य शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात राज्यात सर्वाधिक शाळा असलेल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने बाजी मारली असून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.त्यामुळे मान्यवर नागरिकांनी संस्था चालक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. 1जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 […]

Continue Reading

भिवंडीत बांधकाम व्यावसायिकाची नऊ कोटींची फसवणूक,चार जणांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडीत भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी दीड कोटी रुपये घेऊन परस्पर दुसऱ्या सोबत भागीदार करार करून व्यावसायिकाची नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मे. ब्राईट बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक रणमल जुगराज विरवाडीयार,जितेंद्र रणमल विरवाडीयार,रोहीत रणमल विरवाडीयार,सौ.सपना जितेंद्र विरवाडीयार […]

Continue Reading

मंजूर केलेल्या कामांचे श्रेय आम्ही घेतो,
इतरांसारखे स्वार्थी राजकारण करत  नाही – कपिल पाटील ,भिवंडीचा चेहरामोहरा बदलणार

भिवंडी ( भानुदास भसाळे) भिवंडी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात निधी आणून तो खर्च केला जात आहे.शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करून करून भिवंडी चा काया पालट करण्याचा विशेष प्रयत्न केला जात असल्याची माहिती केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली भिवंडी शहरातील 320 कोटी […]

Continue Reading